Nanded News: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेत गोंधळ, पेपर फुटल्याचा आरोप; विद्यार्थी संतापले

Chandrapur District Bank Exam: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसाठी राज्यभर ऑनलाईन परीक्षा नियोजित करण्यात आली होती. राज्यातील ९ जिल्ह्यात ३१ हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार होते.
Chandrapur District Bank Exam: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेचा पेपर फुटला, विद्यार्थी संतापले
Chandrapur District Bank ExamSaam Tv
Published On

संजय सूर्यवंशी, नांदेड

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विविध पदांसाठी आज पेपर घेण्यात आला. नांदेडमध्ये देखील ईक्यूरा या शाळेत परीक्षार्थींना सेंटर देण्यात आले होते. पेपरसाठी सकाळी १० ते १२ अशी वेळ निश्चित होती. परीक्षार्थीं देखील पेपरसाठी वेळेवर पोहचले.

परंतू अवघ्या १५ मिनिटांत या परीक्षार्थींना तुमचा पेपर झाला असे सांगण्यात आले आणि सेंटर बाहेर काढण्यात आलं असा आरोप या परीक्षार्थींनी केला आहे. ३५८ पदासाठी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा आज राज्यभरात घेण्यात येत आहे. एका खाजगी कंपनीद्वारे ही परीक्षा घेण्यात येत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसाठी राज्यभर ऑनलाईन परीक्षा नियोजित करण्यात आली होती. राज्यातील ९ जिल्ह्यात ३१ हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार होते. मात्र ३ दिवस चालणारी ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आज पहिल्या दिवशी सकाळपासून विद्यार्थी कम्प्युटरवर उत्तर देत असताना उत्तर सबमिट होत नसल्याचे लक्षात आले.

Chandrapur District Bank Exam: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेचा पेपर फुटला, विद्यार्थी संतापले
MPSC Exam 2025: तयारीला लागा! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२५ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, आताचा करा चेक

चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय परीक्षा केंद्रावर यामुळे एकच गोंधळ उडाला. परीक्षा घेणाऱ्या आयटीआय नामक मुंबईच्या कंपनीने सर्वच परीक्षार्थींना बाहेर काढून आजचा पेपर २३ डिसेंबरला होणार असल्याचे अचानक जाहीर केले. राज्यातून लांब लांबून आलेल्या परिक्षार्थ्यांना मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

Chandrapur District Bank Exam: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेचा पेपर फुटला, विद्यार्थी संतापले
MPSC Exam : सार्वजनिक सुट्टीला परीक्षा घेण्याचा अट्टाहास का? लोकसेवा आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थी संघटना नाराज

तर दुसरीकडे पुण्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. ⁠चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या शिपाई पदाच्या ९७ जागांसाठी हजारो पदवीधरांचे अर्ज आळे होते. ⁠पुण्यातील केंद्रावर सर्वर डाऊन झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. ⁠अचानक परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थी आक्रामक झाले. ⁠राज्याच्या अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी आजच्या परीक्षेसाठी पुण्यात आले होते. परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांचे हाल झाले.

Chandrapur District Bank Exam: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेचा पेपर फुटला, विद्यार्थी संतापले
NEET UG Exam: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! NEET UG परिक्षांची तारीख जाहीर होणार; रजिस्ट्रेशन कसं करावं? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com