Shocking : दबा धरुन बसला, तेंदूपत्ता तोडताना झडप घातली; नवऱ्यासमोरच बायकोचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

Chandrapur Woman Dies in Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. चिमूर तालुक्यातील करबडा येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
Chimur taluka woman has died in a tiger attack
Chimur taluka woman has died in a tiger attack Saam TV News
Published On

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. चिमूर तालुक्यातील करबडा येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कचराबाई अरुण भरडे (वय ५४) असं वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव असून तेंदूपत्ता गोळा करताना पतीसमोरच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. पंचनामा करून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह रवाना करण्यात आला. घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव असून चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडणाऱ्या ६ महिलांचा गेल्या ५ दिवसात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी देखील अशीच घटना समोर आली होती. तेव्हा वाघाच्या हल्ल्यात ३ महिला ठार झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या वनविभागाच्या परिक्षेत्रात घडली होती. या घटनेत एकाच कुटुंबातील सासू, सूनेचा मृत्यू झाला होता.

Chimur taluka woman has died in a tiger attack
Nagpur News : कुतूहलापोटी टाकीत डोकावली, तेव्हाच आक्रित घडलं; चार वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू

मृत महिलांची नावे कांता बुधाजी चौधरी (वय ६५), शुभांगी मनोज चौधरी (वय २८), रेखा शालिक शेंडे (वय ५०) अशी आहेत. या तिन्ही महिला मेंढा माल गावातील आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभाग अधिकारी आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले. तिन्ही महिलांच्या मृत्यूने चौधरी आणि शेंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Chimur taluka woman has died in a tiger attack
India-Pakistan Ceasefire: बॉर्डरवर पाकिस्तानशी लढताना BSF जवानाला वीरमरण, ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न; गावावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com