CBSE : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दोन भारतीय भाषा शिकणे बंधनकारक; काय आहे नवा नियम? जाणून घ्या

CBSE Language News : सीबीएसईने त्रिभाषा धोरण लागू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. २०२६-२७ पासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे बंधनकारक असून त्यापैकी किमान दोन भारतीय भाषा असणे आवश्यक राहणार आहे.
CBSE THREE-LANGUAGE POLICY 2026: TWO INDIAN LANGUAGES MANDATORY FOR STUDENTS UNDER NEP 2020
CBSE THREE-LANGUAGE POLICY 2026: TWO INDIAN LANGUAGES MANDATORY FOR STUDENTS UNDER NEP 2020Saam Tv
Published On
Summary
  • सीबीएसईने NEP 2020 अंतर्गत त्रिभाषा धोरणासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली

  • २०२६-२७ पासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे बंधनकारक

  • त्यापैकी दोन भारतीय भाषा असणे आवश्यक

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे बंधनकारक असणार असून, त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० अंतर्गत त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ही नव्याने मार्गदर्शक तत्त्वे ‘सीबीएसई’ने जाहीर केली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहेत.

सीबीएसईने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य विकसित करणे, भारतीय भाषांचे संवर्धन करणे आणि भाषाशिक्षण अधिक प्रभावी बनवणे हा या धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त परीक्षांचा ताण टाकण्याऐवजी त्यांच्या भाषिक विकासाला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नववीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागतील. दोन भारतीय भाषा शिकणारे विद्यार्थी तिसरी भाषा म्हणून इंग्रजीसह अन्य भाषा किंवा आणखी एक भारतीय भाषा निवडू शकतील. मात्र, एक भारतीय आणि एक परकीय भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा भारतीयच घ्यावी लागणार आहे.

CBSE THREE-LANGUAGE POLICY 2026: TWO INDIAN LANGUAGES MANDATORY FOR STUDENTS UNDER NEP 2020
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

सध्या नववीत शिकत असलेल्या आणि आधीपासून दोन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना त्यांची भाषा व्यवस्था कायम ठेवता येईल. मात्र, त्यांना अतिरिक्त भारतीय भाषा शिकावी लागेल. या अतिरिक्त भाषेचे मूल्यमापन शाळास्तरावर होईल आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेत तिचा समावेश केला जाणार नाही. सध्या सातवी किंवा आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अशीच सवलत देण्यात आली आहे. त्यांनाही एक अतिरिक्त भारतीय भाषा शिकावी लागेल; मात्र दहावीपर्यंत त्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही.

CBSE THREE-LANGUAGE POLICY 2026: TWO INDIAN LANGUAGES MANDATORY FOR STUDENTS UNDER NEP 2020
Gold Rate Today : महिन्याच्या अखेरीस सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा १८००० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

दिव्यांग विद्यार्थी, परदेशातील सीबीएसई शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच परदेशातून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्यापासून सूट देण्यात आली आहे. तसेच पालकांच्या बदली किंवा स्थलांतराच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना पूर्वी निवडलेली तिसरी भाषा कायम ठेवण्याची मुभा देण्यात येणार आहे. दरम्यान, २०२६-२७ मध्ये सहावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून त्रिभाषा धोरणाची पूर्ण अंमलबजावणी सुरू होईल. हिंदी, मराठी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, गुजराती, पंजाबी, ओडिया आणि आसामीसह २२ अनुसूचित भाषा भारतीय भाषांमध्ये समाविष्ट असून इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि अरबी या परकीय भाषा म्हणून गणल्या जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com