Ramdas Kadam News : रामदास कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मुलांविरोधात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?

Crime News : मेसर्स योगीसिद्धी डेवेलपर्स या कंपनी विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Ramdas Kadam
Ramdas KadamSaam TV
Published On

Political News : शिवसेना नेते रामदास कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांच्या दोन्ही मुलांच्या कंपनी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मेसर्स योगीसिद्धी डेवेलपर्स या कंपनी विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रामदास कदम (Ramdas Kadam) यांची दोन्ही मुले योगेश कदम आणि सिद्धेश कदम दोन्ही योगीसिद्धी डेव्हलपर्समध्ये पार्टनर आहेत. सदर कंपनीने कांदिवली स्थित सिटीएस 147 वर एसआरए योजने अंतर्गत सुमुख हिल्स नावाच्या इमारतीचा पुर्नविकास केला आहे. मात्र या इमारतीमध्ये कायद्याची पायमल्ली करण्यात आल्याचा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

Ramdas Kadam
Crime News In Mumbai : आयुष्य उद्ध्वस्त झालं...; झटपट पैसे कमवण्यासाठी तरुणाने केलं हे भयानक कृत्य

सोमवारी या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायाधीश गंगापूरवाला यांच्या समोर सुनावणी झाली. मात्र याचिकाकर्त्याला सुनावणी पूर्वी एक लाख रुपये जमा करण्याचे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

सदर रक्कम जमा करण्यासाठी याचिकाकर्त्याला 3 आठवडण्याची मुद्दत कोर्टाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 जून रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्ता तर्फे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी युक्तिवाद केला आहे.

Ramdas Kadam
Nashik Water Supply News: ऐन उन्हाळ्यात नाशकात पाणीबाणी; 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com