Nashik Water Supply News: ऐन उन्हाळ्यात नाशकात पाणीबाणी; 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

Water Supply Will Cut In Nashik: शहरात शनिवारी अप्रत्यक्षपणे पाणीकपात होणार आहे.
Water Supply
Water Supply SaamTV

Nashik News : एकीकडे शहरावर पाणी कपातीचं संकट असतांनाच शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणच्या शट डाऊनमुळे शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतलाय. त्यामुळे शहरात शनिवारी अप्रत्यक्षपणे पाणीकपात होणार आहे. (Water Supply)

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणांच्या पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी पावसाळा पूर्व कामांसाठी महावितरणकडून शनिवारी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वीज नाही तर पाणी पंपिंग होणार नसल्याने नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. तर रविवारी सकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

Water Supply
Pune Crime News : "ब्लू बेल्स" शाळेच्या इमारतीत घडत होत्या नको त्या घटना; संतापजनक कृत्यांमुळे शाळेची मान्यत रद्द

दरम्यान, अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस गरज पडल्यास जून आणि जुलै महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठवलाय. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसतांना दुसरीकडे महावितरणमुळे शहरात शनिवारी पाण्याचा ड्राय डे ठेवण्याची वेळ आलीय.

Water Supply
Constipation : पोटात सारखा गॅस, पोट होत नाही साफ, हे खा आणि २ मिनीटात मोकळे व्हा

उन्हाळ्यामुळे सर्वत्र नागरिक हैराण झाले आहेत. ऊन जास्त असल्याने सतत जिभेला सोक पडत आहे. उष्णतेमुळे सर्वच नागरिक जास्त पाणी पितात. अशा कडक उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी थोडी कसरत करावी लागणार आहे. शनिवारी पाणिपुरवठा बंद असल्याने नागरिकांना शुक्रवारीच जास्त पाण्याचा साठा करावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com