Sangli विषबाधा प्रकरण; आश्रमशाळेच्या सचिव, मुख्याध्यापकासह 5 जणांवर गुन्हा, दाखल चाैघे निलंबित

दरम्यान आश्रमशाळा चालवताना व्यवस्थापनाने गंभीर चूक केल्याने संस्थेची मान्यता रद्द का करु नये अशी कारणे दाखवा नोटीस व्यवस्थापनाला प्रशासनाने बजावली आहे.
sangli, umadi ashram shala
sangli, umadi ashram shalasaam tv
Published On

Sangli Food Poisoning Case : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदीमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी संस्थेचे सचिव, मुख्याध्यापकासह 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात दोन मुख्याध्यापक तसेच दोन अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Maharashtra News)

sangli, umadi ashram shala
Maval News : नेमका कुणाचा वरदहस्त? मावळात बेकायदेशीर दारू विक्री पुन्हा सुरू

जत तालुक्यातील उमदी येथील आश्रमशाळेतील जवळपास १६९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (169 children of ashram school in sangli fall ill after eating leftovers) झाली. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान आश्रमशाळा चालवताना व्यवस्थापनाने गंभीर चूक केल्याने संस्थेची मान्यता रद्द का करु नये अशी कारणे दाखवा नोटीस व्यवस्थापनाला प्रशासनाने बजावली आहे.

sangli, umadi ashram shala
Pankaja Munde At Mahurgad : भाऊला मी सोबत घेऊन आले आहे... आता रेणूका माताच मार्ग दाखवेल : पंकजा मुंडे

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सांगलीतील समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत मुरलीधर चाचरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार संस्थेचा सचिव श्रीशैल कल्लाप्पा होर्तीकर, मुख्याध्यापक सुभाषचंद्र महादेवाप्पा होर्ती, मुख्याध्यापक सुरेश चनगोंड बगली, अधीक्षक विकास तुकाराम पवार, अधिक्षिका अक्कमहादेवी सिध्धन्ना निवर्गी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पाेलिस तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com