आर्वी-अमरावती मार्गावर अपघात, भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण गंभीर

आर्वी-अमरावती मार्गावर अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली.
Jalgaon Accident News
Jalgaon Accident NewsSaam tv
Published On: 

आर्वी-अमरावती मार्गावर अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्देवी घटना आर्वी-अमरावती मार्गावरील कर्माबाद शिवारात घडली. गोलू पाटील असं अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर जय खोपे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. (Accident on arvi amravati road one person died one injured)

Jalgaon Accident News
Mumbai Crime: टीव्ही अभिनेत्यानं फॅशन डिझायनरचं केलं अपहरण, चार कलाकार गजाआड, नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, आर्वी येथे राहणारे गोलू जयकुमार पाटील आणि जय खोपे हे दोघंही दुचाकीने अमरावती-आर्वी रोडने घरी जात होते. त्यांच्या वाहनाचं इंधन संपल्यानं ते कर्माबाद इथे उभे होते. याच दरम्यान एका कारनं त्यांना धडक दिली.या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.