Mumbai Crime: टीव्ही अभिनेत्यानं फॅशन डिझायनरचं केलं अपहरण, चार कलाकार गजाआड, नेमकं प्रकरण काय आहे?

सिनेविश्वातून एक धक्कादायक घटना समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
Gujrat crime update
Gujrat crime updatesaam tv
Published On

संजय गडदे

मुंबई : सिनेविश्वातून एक धक्कादायक घटना समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गुजराती अभिनेत्यानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं एका फॅशन डिझायनरचं आठ लाख रुपयांसाठी अपहरण केलं. उत्तर प्रदेश (uttar pradesh) येथील हरिशरण मिश्रा अंस अपहरण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या धक्कादायक प्रकाराची दिंडोशी पोलिसांना महिती मिळताच पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं फिरवली. त्यानंतर वापी टोक नाक्यावरून दिंडोशी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. हे आरोपी गुजराती टीव्ही सिरीयल मध्ये काम करत आहेत. (Fashion designer abduction case dindoshi police arrested four culprits)

Gujrat crime update
India vs Zimbabwe Weather Report: टीम इंडियासाठी व्हिलन बनणार मेलबर्नचं हवामान, कारण...

मिळालेल्या माहितीनुसार,चार कलाकारांनी दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून भरदिवसा फॅशन डिझायनरचं अपहरण केलं. आरोपी अपहरण केलेल्या व्यक्तीला वापीच्या दिशेने घेऊन चालले होते.मात्र, या प्रकाराची पोलिसांना खबर लागताच पोलिसांनी चारही आरोपींना वापी टोलनाक्यावर ताब्यात घेऊन अटक केली.

Gujrat crime update
'गुजरात निवडणूक लढवू नका, आम्ही...'; भाजपने ऑफर दिल्याचा अरविंद केजरीवालांनी केला गौफ्यस्पोट

या आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिंडोशी पोलिसांना मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन या दोन्ही गोष्टींच्या साह्याने आरोपींना गुजरातच्या मार्गावर पडकण्यात आलं. अपहरण झालेल्या व्यक्तीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे.

हरिशरण मिश्रा हे डिझायनरचे काम करतात.पूर्वी ते सुरत येथे एका फरार आरोपीकडे काम करत होते.एका आरोपीने मिश्रांना मदत म्हणून सहा लाख रुपये दिले होते. मात्र फरार आरोपी हे पगार देत नसल्याने मिश्रांनी कर्जाची परतफेड केली नव्हती, अशी माहिती गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शिंदे यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com