
शहापूरमध्ये एका कारमध्ये तिघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. शहापूरमधील उंबरमाली गावानजीक ही धक्कादायक घटना समोर आली आहे. ही कार अपघातग्रस्त असून झाडाझुडपात पडली होती. गुरांना चारण्यासाठी गेलेल्या महिलेला ही कार दिसली आणि तिने कारमध्ये डोकावून पाहिले असता तिला त्यामध्ये तिघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसले. हा अपघात चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूरमध्ये एका अपघातग्रस्त कारमध्ये तिघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले. गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या निदर्शनास ही कार आली. ही महिला कारच्या दिशेने जशीजशी जवळ गेली तसं तिला त्याठिकाणी प्रचंड दुर्गंधी आली. त्यानंतर या महिलेने कारमध्ये डोकावून पाहिले तर तिला तिघांचे मृतदेह दिसून आले. या महिलेने गावातील नागरिकांना याची माहिती दिली. गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
शहापूर तालुक्यातील उंबरमाली येथे मुंबई- नाशिक महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर ही कार नाल्यातील झाडाझुडपा पडलेल्या अवस्थेत आढळून आली. या कारला चार ते पाच दिवसांपूर्वी अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारनंतर उंबरमाली येथे राहणारी एक महिला गुरे चारण्यासाठी गेली होती. गुरे चारत असताना तिचे लक्ष झाडाझुडपात पडलेल्या कारकडे गेले. तिने जवळ जाऊन बघितले तर या कारमधून दुर्गंधी येते होती.
या महिलेने उंबरमाली गावातील ग्रामस्थांना बोलावून घेतले आणि कसारा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी कारची तपासणी केली. तर या कारमध्ये तीन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. या कारची माहिती घेतली असता ती मुंबईतील अंधेरीतील असल्याचे कळाले. अधिक तपास केला असता या कारमध्ये यज्ञेश वाघेलासह अन्य दोघांचे मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या तिघांचे अंदाजे वय २५ ते ३० वर्षे असल्याचे समजते. तिघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.