नंदुरबारमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुमाकूळ; नेत्यांच्या घरच्या उमेदवारांमुळे निवडणूक बनली प्रतिष्ठेची

अक्कलकुवा तालुक्यातील खापर गटात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये सरळ लढत आहे.
नंदुरबारमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुमाकूळ; नेत्यांच्या घरच्या उमेदवारांमुळे निवडणुक बनली प्रतिष्ठेची
नंदुरबारमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुमाकूळ; नेत्यांच्या घरच्या उमेदवारांमुळे निवडणुक बनली प्रतिष्ठेचीदिनू गावित
Published On

नंदुरबार:- नंदुरबार जिल्ह्यातील 11 जिल्हा परिषद Zilla Parishadगट व पंचायत समितीच्या 14 गणांसाठी जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीच्या By-election प्रचाराचा धुमाकूळ सुरू असून अक्कलकुवा तालुक्यातील खापर गटात भाजप BJP आणि काँग्रेस Congress उमेदवारांमध्ये सरळ लढत आहे. काँग्रेसने गीता पाडवी यांना उमेदवारी दिली असून भाजपने नागेश पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. (By-election campaign in Nandurbar)

राजकीय पार्श्वभूमी व प्रचाराचा धुमाकूळ पाहता खापर गटात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे उमेदवार नागेश पाडवी यांच्या प्रचारासाठी भाजप आमदार राजेश पाडवी BJP MLA Rajesh Padvi व भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील कोळदे गटातून भाजपचे आमदार विजय कुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांनी राजकारणात पदार्पण केले असून आपल्या मुलीच्या विजयासाठी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व बहीण खासदार डॉक्टर हिना गावित Hina Gavit यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

नंदुरबारमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुमाकूळ; नेत्यांच्या घरच्या उमेदवारांमुळे निवडणुक बनली प्रतिष्ठेची
Drug Case: शाहरुखचा मुलगा आर्यनला एनसीबीनं घेतलं ताब्यात; चौकशी सुरु

तर कोपरली गटात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी शिवसेने Shivsena कडून निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर भाजपचे उमेदवार पंकज गावित यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी NCP आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com