Amravati Bus Accident : अमरावतीत बसचा भीषण अपघात, 4 सरकारी कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू; 15 जणांची प्रकृती चिंताजनक

Amravati News: अमरावतीत 50 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
अमरावतीत बसचा भीषण अपघात, 4 सरकारी कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू; 15 जणांची प्रकृती चिंताजनक
Amravati Bus Accident Saam Tv
Published On

अमर घटारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

अमरावतीत एक भीषण अपघात झाला आहे. येथे 50 प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका बसचा अपघात झाला आहे. परतवाडा ते धारणी रोडवर सेमाडोह नजीक घाट वळणातील नाल्यात कोसळून या बसचा अपघात झाला. या खासगी बसमधून सगळे शासकीय कर्मचारी प्रवास करत होते. त्यामधील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 15 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. तर जखमींची संख्याही जास्त आहे.

प्रांजली रघुनाथ इंगळे (राहणार अमरावती), राजेंद्र मोतीलाल पाल (राहणार भोकरबर्डी), पल्लवी कदम, (सीएचओ चिचघाट फुलवंती) आणि राजू काजळे (राहणार रोहिणीखेडा), अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

अमरावतीत बसचा भीषण अपघात, 4 सरकारी कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू; 15 जणांची प्रकृती चिंताजनक
Cabinet Decision : कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे 24 निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा वरून धारणीकडे जाणारी चावला ट्रॅव्हल्स नावाची खाजगी बस घाट रस्त्यामध्ये जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलावर दरीत कोसळली. या बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले असून यात चार ठार झाल्याची माहिती आहे.

जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडोह येथे उपचार करून पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवण्यात आलं आहे. त्यामध्ये 15 जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी भेट दिली असून मृतक व्यक्तींच्या नातेवाईकांना धीर दिला आहे.

अमरावतीत बसचा भीषण अपघात, 4 सरकारी कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू; 15 जणांची प्रकृती चिंताजनक
ITI Institutes Renaming: ब्रेकिंग! राज्यातील १४ आयटीआय संस्थांची नाव बदलली; कोणत्या कॉलेजला कुठले नाव? वाचा संपूर्ण यादी

दरम्यान, अपघातग्रस्त जखमी रुग्णांची अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, आमदार बच्चू कडू, माजी खासदार नवनीत राणा यांनीही भेट घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com