Buldhana: झेंडावंदनाची तयारी करताना मुख्याध्यापकाचा मृत्यू, शाळेच्या प्रांगणात जागीच सोडले प्राण

Principal Died After Heart Attack: बुलडाण्यामध्ये झेंडा वंदनाची तयारी करत असताना मुख्याध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तयारी करत असताना ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांनी शाळेच्या प्रांगणातच प्राण सोडले.
Buldhana: झेंडावंदनाची तयारी करताना मुख्याध्यापकाचा मृत्यू, शाळेच्या प्रांगणात जागीच सोडले प्राण
Saam Tv
Published On

Summary -

  • झेंडावंदनाची तयारी करत असताना मुख्याध्यापकाचा मृत्यू

  • दिलीप राठोड तयारी करत असताना खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला

  • हृदयविकाराच्या झटक्याने शाळेच्या प्रांगणातच त्यांनी प्राण सोडले

  • विद्यार्थी आणि गावकऱ्यांंनी व्यक्त केली हळहळ

संजय जाधव, बुलडाणा

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह ओसंडून वाहत असताना बुलडाण्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. झेंडावंदनाची तयारी करत असताना मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. तयारी सुरू असतानाच ते चक्कर येऊन खाली पडले आणि जागीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील मोहेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ही घटना घडली. मुख्याध्यापकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली. ध्वजवंदनाची तयारी करत असताना मुख्याध्यापक दिलीप राठोड हे चक्कर येऊन खाली कोसळले. त्यामुळे झेंडावंदनाची तयारी करत असताना एकच गोंधळ उडाला. सर्वजण दिलीप राठोड यांच्या चेहऱ्यावर पाणी मारून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होते.

Buldhana: झेंडावंदनाची तयारी करताना मुख्याध्यापकाचा मृत्यू, शाळेच्या प्रांगणात जागीच सोडले प्राण
Shocking: ७ तरुणी अन् एक तरुण दोन फ्लॅटमध्ये नको त्या अवस्थेत सापडले, अश्लिल व्हिडीओ कॉल अन्...

उपस्थितांनी त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दिलीप राठोड यांनी हृदयविकाराच्या धक्क्यामुळे शाळेच्या प्रांगणातच प्राण सोडले. या घटनेमुळे उपस्थित गावकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिलीप राठोड यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Buldhana: झेंडावंदनाची तयारी करताना मुख्याध्यापकाचा मृत्यू, शाळेच्या प्रांगणात जागीच सोडले प्राण
Shocking : राजगडावर चढताना धाप लागली अन् खाली कोसळला, २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, धाराशिवच्या उमरगा येथील तलमोड चेकपोस्ट येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी कार्यक्रमासाठी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते. या दरम्यान उपस्थित राहीलेले दारूबंदी अधिकारी मोहन जाधव हे फोटो काढत असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते रस्त्यावर खाली कोसळले. त्यांनी जागेवरच प्राण सोडले. हृदविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

Buldhana: झेंडावंदनाची तयारी करताना मुख्याध्यापकाचा मृत्यू, शाळेच्या प्रांगणात जागीच सोडले प्राण
Shocking: फुटबॉलचा सामना सुरू असताना अंदाधुंद गोळीबार, ११ जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com