
संजय जाधव, साम टीव्ही
बुलढाणा : एकीकडे HMPV विषाणूने डोकं वर काढलेलं असताना बुलढाण्यातील गावकऱ्यांचं एका नव्या व्हायरसनं टेन्शन वाढवलं आहे. या नव्या व्हायरसने गावात धुमाकूळ घातला आहे. गावातील लोकांचे अवघ्या तीन दिवसांत टक्कल पडत असल्याचं समोर येत आहे. या टक्कल बाधित लोकांचा आकडा वाढू लागला आहे. या टक्कल व्हायरसने गावातील लोकांची झोप उडाली आहे.
बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील काही गावातील नागरिक केस गळती आणि टक्कल बाधितांची संख्या वाढली आहे. या तालुक्यातील बाधितांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांपासून या लोकांना व्हायरसने ग्रासलं आहे. आज बुधवारी परिसरातील काही गावात २५ नवीन बाधित आढळल्याने बाधितांची संख्या वाढली आहे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घेतली आहे. या आजाराचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.
आज आरोग्य प्रशासनाने पाच बाधितांचे केस आणि डोक्यावरील त्वचेचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले आहेत. या आजाराचं निदान उद्या किंवा परवा तपासणी अहवाल आल्यावर होणार आहे. आरोग्य विभागाचे पथक या परिसरात ठाण मांडून आहेत. या व्हायरसचा ठाव आरोग्य विभागाच्या पथकाकडून घेतला जात आहे.
शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसने संपूर्ण कुंटुंब बळी ठरत आहे. या प्रकरणात सुरुवातीला डोके खाजवणे, नंतर हातात सरळ केस येणे आणि तिसऱ्या दिवशी थेट टक्कल पडत असल्याचा प्रकार घडत आहे.
शॅम्पू वापरल्यामुळे असा प्रकार घडत असल्याचे काही डॉक्टरांचं मत आहे. तर आयुष्यात कधीही शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे. शेगावातील कालवड, बोंडगाव आणि हिंगणा या गावात हा प्रकार घडला आहे. या समस्येबाबत सरकार काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.