Buldhana Market : नाफेड अंतर्गतची शासकीय खरेदी केंद्र बंद; बारदानाअभावी सोयाबीन खरेदी रखडली

Buldhana News : सोयाबीन या शेतमालाला मार्केटमध्ये योग्य भाव मिळत नसल्यामुळे सरकारने सोयाबीनला हमीभाव जाहीर करत नाफेड अंतर्गत शासकीय खरेदी केंद्र सुरु केली परंतु शासकीय खरेदी बारदानाअभावी बंद पडली
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेड अंतर्गत शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात आली होती. या केंद्रांवर सोयाबीनची काही दिवस खरेदी करण्यात आली. मात्र साधारण आठवडाभरापासून बुलढाणा जिल्ह्यातील नाफेडची शासकीय खरेदी केंद्र बंद पडली आहे. या केंद्रांवर बारदान नसल्याने येथील सोयाबीन खरेदी रखडली आहे. 

सोयाबीन या शेतमालाला मार्केटमध्ये योग्य भाव मिळत नसल्यामुळे सरकारने सोयाबीनला हमीभाव जाहीर करत नाफेड अंतर्गत शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात आली होती. परंतु ही शासकीय खरेदी बारदाना अभावी बंद पडलेली आहे. वाशीम- हिंगोली जिल्ह्यातील केंद्रांपाठोपाठ आता बुलढाणा जिल्ह्यातील केंद्र देखील बंद पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. सोयाबीनची विक्री कोठे करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 

Buldhana News
Sambhajinagar Police : परवानगी नसलेला ७२ लाखांचा गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त; संभाजीनगर पोलिसांनी कारवाई

सोयाबीन खरेदीस टाळाटाळ 
तसेच शेतकऱ्यांच्या घरात अजुन देखील फार मोठ्या प्रमाणात सोयाबीन पडलेला असुन खरेदी ही संथ गतीने सुरु आहे. शेतमाल केंद्रावर बोलावून शेतमालामध्ये मॉयश्चर, काडी कचरा, फुटतुट, डागी प्रमाण अशी कारणे देऊन शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. शेतकरी या शासकीय खरेदीवरच आस लावुन बसलेले असुन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतमाल नोंदणी केलेली आहे.

Buldhana News
Pandharpur Vitthal Mandir : लाडू प्रसाद विक्रीतून सहा कोटीचे उत्पन्न; विठ्ठल मंदिर समितीच्या ड्रायफूटयुक्त लाडू प्रसादाला मागणी

केंद्र तात्काळ सुरु करण्याची मागणी 
दरम्यान सोयाबीन खरेदी बंद अवस्थेमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल हा कवडीमोल भावात मोजावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील नाफेड अंर्तगत सुरु करण्यात आलेली शासकीय खरेदी केंद्र बारदाना अभावी बंद पडलेले आहे. ते पुर्ववत सुरु करण्यात यावीत; अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत निवेदन देखील देण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com