संजय जाधव, साम टीव्ही
बुलढाणाच्या चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची धारदार चाकूने हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक फत्तेसिंह सुरडकर असं आरोपीचं नाव असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे. मिळालेल्या महितीनुसार, आरोपी दीपक सुरडकर याने आपली 70 वर्षीय याइ सरस्वती फत्तेसिंह सुरडकर, 55 वर्षीय भाऊ संजय फत्तेसिंह सुरडकर आणि 25 वर्षीय पुतण्या रणजीत संजय सुरडकर यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे सोमठाणा गावासह संपूर्ण चिखली तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, दीपकच्या हिश्श्याची शेती त्याच्या आईने भावाच्या नावावर केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून, फरार आरोपी दीपक सुरडकर याचा शोध सुरू आहे. या तिहेरी हत्याकांडामागील नेमकं कारण आणि संपूर्ण घटनाक्रम पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.