लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या बहिणीचा संताप, आलेल्या मंत्र्यांनाच सुनावलं

Buldhana farmer Kailash Nagre Commits Suicide : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नांगरे यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली.
 Kailash Nagare Sister Satyabhama Nagare
Kailash Nagare Sister Satyabhama NagareSaam Tv News
Published On

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नांगरे यांनी दोन दिवसांपूर्वी आपलं जीवन संपवलं. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसाठी हक्काचं पाणी मिळावं अशी मागणी करत त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. या घटनेने राज्यभरातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत संतापही व्यक्त केला. त्यातच, कैलास नांगरे यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला मंत्री महोदयांसह दिग्गजांची उपस्थिती होती. त्यावेळी, कैलास नागरे यांच्या बहिणीने आपला मनातील संताप बोलून दाखवला.

लाज वाटली पाहिजे, पालकत्व येत नसेल तर पालकत्व का स्वीकारता? देशाला कृषिप्रधान म्हणता? लाज नाही वाटत. माझ्या भावाच्या नावासमोर आत्महत्या नाही तर बलिदान हा शब्द लावण्यात यावा, अशा शब्दात पीडित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या बहिणीने मंत्री महोदयांनाच सुनावलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील आत्महत्या केलेल्या युवा शेतकरी कैलास नागरे यांची बहीण सत्यभामा नागरे यांनी मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार सुनील कायंदे यांच्या समोर राजकारण्यांना खडेबोल सुनावले.

 Kailash Nagare Sister Satyabhama Nagare
Beed Crime: 'दादा'ला दोन दिवस झाडावर लटकवलं, नंतर अमानुष मारहाण अन्...; विकाससोबत घडलेलं कृत्य भावानं रडत रडत सांगितलं!

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नांगरे यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली. कैलास नांगरे यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज त्यांच्या मूळ गावी शिवनी आरमाळ येथे संपन्न झाला. यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, महिला शेतकरीही उपस्थित होत्या.

 Kailash Nagare Sister Satyabhama Nagare
मोठी बातमी! पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, बसची अक्षरश: राख, पुलवामाची पुनरावृत्ती; पाकचे ९० जवान ठार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com