धक्कादायक! तीन पानी 'सुसाईड नोट ', सणाच्या दिवशीच राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer Suicide: बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात शिवनी आरमाळ येथे युवा पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याने सणाच्या दिवशी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
Buldhana Farmers
Buldhana Farmerssaam tv
Published On

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने सणाच्या दिवशीच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या शेतकऱ्याने तीन पानांची सुसाईड नोट लिहून आपले मनोगत व्यक्त केले. खडकपुर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी न मिळाल्याने शासनाच्या निषेधार्थ हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शिवनी आरमाळ येथे युवा शेतकरी कैलास नागरे यांनी शेतीसाठी पाणी न मिळाल्याच्या निषेधार्थ आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी स्पष्ट करत शासनाच्या दुर्लक्षाचा उल्लेख केला आहे. कैलास नागरे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमुळे संतापाची लाट उसळली आहे.

Buldhana Farmers
रेल्वे प्रशासनाचा इशारा, धावत्या गाड्यांवर रंगांचे फुगे फेकल्यास होईल कठोर कारवाई

पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी ठोस आश्वासन देईपर्यंत मृतदेह नेऊ दिला जाणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने शेतकरी जमले असून, पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण आहे.

Buldhana Farmers
Pune Crime: घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरी, पुणे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

सुसाईड नोटमध्ये त्यांनी शेतीसाठी पाणी न मिळाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर संतप्त शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला असून, पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी ठोस आश्वासन देईपर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना सोपवणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला असून, घटनास्थळी मोठ्या संख्येने शेतकरी जमले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे.

काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट!

आत्महत्येपूर्वी कैलास नागरेंनी लिहिली ४ पानांची सुसाईड नोट! आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा, पण पाणी नाही; खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी..

* केळी, पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा; राख आनंदस्वामी धरणात टाका; रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व विधी उरका म्हणाले.

* मुख्यमंत्र्यांना म्हणाले, माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारा...

* मुलांचे शिक्षण करण्यासाठी, सुखदःख करण्यासाठी मी असमर्थ ठरलो, स्वतः शून्य झालो अन् मुलं,बाबा,बायको यांनाही शून्य करूनच जातोय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com