रेल्वे प्रशासनाचा इशारा, धावत्या गाड्यांवर रंगांचे फुगे फेकल्यास होईल कठोर कारवाई

Pune Police: संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Pune Police
Pune Policegoogle
Published On

लोहमार्ग पोलिसांनी धावत्या रेल्वे गाड्यांवर रंग भरलेले फुगे फेकण्यास सक्त मनाई केली असून असे कृत्य केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

होळी आणि धुलीवंदनाच्या उत्साहात नागरिक मोठ्या प्रमाणावर रंग खेळतात. काही जण अतिउत्साहाच्या भरात धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकतात, विशेषतः दाट वस्तीमधून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर असे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर, लोणावळा, चिंचवड आणि दौंड स्थानक परिसरात सुरक्षा गस्त वाढवली आहे.

Pune Police
Holi 2025: मुलीवर रंग टाकला की ठरतं लग्न! भारतातील 'या' गावातील अजब रीत वाचून व्हाल थक्क

धावत्या रेल्वे गाडीवर रंगाचे फुगे फेकल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी खबरदारी घेतली असून, अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

Pune Police
Holi Colors 2025: होळीसाठी रंग खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

गेल्या वर्षी चिंचवड, खडकी, दौंड आणि लोणावळा परिसरात धावत्या रेल्वेगाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. काही जण फुग्यांमध्ये दुषित पाणी भरून प्रवाशांना लक्ष्य करत होते. या घटनांना आळा घालण्यासाठी यंदा लोहमार्ग पोलिसांनी विशेष गस्त सुरू केली आहे. प्रमुख रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्त वाढवण्यात आला असून, अशा कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे.

Pune Police
Pune Metro: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रंगपंचमीला पुणे मेट्रो राहणार बंद

दरम्यान, दरवर्षी होळी आणि धुलीवंदनाच्या काळात पिशव्या आणि फुगे फेकून मारल्याने अनेक प्रवासी जखमी होत असतात. तर या प्रकारामध्ये काही प्रवाशांना आपले डोळेही गमवावे लागल्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी आता पुढाकार घेत असे प्रकार टाळण्यासाठी उपाय योजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून डोंबिवली रेल्वे रुळांलगत असलेल्या भागांमध्ये, वस्तीमध्ये रेल्वे पोलिसांचे पथक ठिकठिकाणी फिरून याबाबत जनजागृती करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com