Dhanshri Shintre
भारतात होळी सर्वत्र उत्साहात साजरी होते. या सणाच्या विविध पारंपरिक प्रथा आणि रीती प्रांतानुसार वेगळ्या असतात.
होळी हा वसंत ऋतूचा रंग आणि प्रेमाचा सण आहे, ज्यामध्ये पुरळपोळी, रंग आणि धुडवड यांचे खास आकर्षण असते.
होळीला लोक एकमेकांना रंग लावतात आणि देशभर विविध रंगांची उत्साही धूम पाहायला मिळते, आनंदाचा सण साजरा होतो.
रंगांचा सण होळी शतकांपासून समाजातील सर्व जाती, वर्ग, वयोगट आणि पिढ्यांना एकत्र आणण्याची सुंदर परंपरा जपतो.
भारतात एका ठिकाणी अनोखी होळीची प्रथा आहे, जिथे पुरुषाने कुमारी मुलीला रंग लावल्यास त्यांना तिच्याशी लग्न करावे लागते.
मुलीने लग्नास नकार दिल्यास त्या गुन्ह्यासाठी, संबंधित तरुणाची संपूर्ण संपत्ती जप्त करून तिच्या नावावर करण्यात येते, ही अनोखी प्रथा आहे.
झारखंडच्या पश्चिम सिंहभूमपासून पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीपर्यंत अनेक भागांत ही अनोखी होळीची परंपरा आजही कायम आहे.