Saam Tv
होळीला पुरणाची पोळी खाण्याची महाराष्ट्रात पद्धत आहे.
काही ठिकाणी रंगपंचमीच्या आधी म्हणजेच होळीला पुरणपोळी खाल्ली जाते.
चला तर या मागचं खरं शास्त्रीय कारण जाणून घेऊयात.
होलीका दहन यालाच कोकणात 'होम लावणे' म्हणतात. या दिवशी लाकडांची पुजा करून त्यांना जाळलं जातं.
त्या अग्नीत वाईट प्रवृत्तींचा त्याग केला जातो आणि आनंदावर विजय मिळवला जातो. म्हणून घराघरात लोक आनंद साजरा करण्यासाठी पुरणपोळी करतात.
तर दुसरं कारण म्हणजे मार्च महिन्यात रब्बी पिकांची कापणी होते.
त्यावेळेस पुरणपोळीला लागणारे साहित्य म्हणजेच गहू, चणा डाळ आणि गुळ ही रब्बीची पिके एकत्र करून देवाला प्रसाद दाखवला जातो.
यंदा होलीका दहन २४ मार्चला पहाटे होणार आहे. तर २५ मार्चला धुलीवंदन असणार आहे.
यंदा तर १०० वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग आलेला आहे. हे वर्षातील पहिले चंद्रग्रहण दिसणार आहे.