Buldhana Accident: मिक्सर ट्रकची दुचाकीला जबर धडक; अपघातात पती-पत्नीची ताटातूट, पत्नीचा जीव वाचला पण पतीचा मृत्यू

Buldhana Road Accident: बुलढाण्यातील पिंपळगाव सराई ते सैलानी रस्त्याजवळ भीषण अपघात झाला आहे.
 Accident News
Accident News saam tv
Published On

Buldhana Accident News:

बुलढाण्यात अपघाताचं वृत्त हाती आलं आहे. बुलढाण्यातील पिंपळगाव सराई ते सैलानी रस्त्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या रस्त्यावर मिक्सर ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर अपघातस्थळी एकच खळबळ उडाली होती. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई ते सैलानी रस्त्यावरील मारुती मंदिरासमोर भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे साहित्य वाहून नेणाऱ्या मिक्सर ट्रकने मोटरसायकलला जबर धडक दिली.

या धडकेत संजय तुकाजी हाडे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात त्यांची पत्नी रंजना संजय हाडे (४५) गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातातील पती-पत्नी वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोहगाव हाडे येथील राहणारे असल्याचे समजते.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील जखमी महिलेला बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . तर या भीषण अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातानंतर मोटरसायकल व मिक्सर ट्रक रायपूर पोलीस स्टेशनला नेण्यात आला आहे. रायपूर पोलिसांत ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

 Accident News
Ahmednagar News: अत्यंत दुर्दैवी! निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. या महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. आज देखील एका कारचा मागचा टायर फुटला. यामुळे समृद्धी महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com