Buldhana News
Buldhana NewsSaam tv

Buldhana News : विज वाहिनी निरीक्षणासाठी आलेल्या पथकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Buldhana News : महावितरणच्या खामगाव ग्रामीण उपविभागात शिरजगाव देशमुख येथे कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ चिरंजीलाल जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसह जनता नगरमधील वीज वाहिनीचे निरिक्षण करण्यासाठी गेले होते
Published on

संजय जाधव 
बुलढाणा
: महावितरणकडून मोहीम राबविण्यात येत असून या अंतर्गत वीज वाहिनी निरीक्षण, मीटर तपासणी केली (Buldhana) जात आहे. यासाठी नेमलेले पथक आले असता, या पथकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या (Mahavitaran) प्रकाराबाबत पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

Buldhana News
Kunbi Certificate: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या घरातच कुणबी नोंदी नाहीत; आरक्षणापासून वंचित राहणार?

महावितरणच्या खामगाव (Khamgaon) ग्रामीण उपविभागात शिरजगाव देशमुख येथे कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ चिरंजीलाल जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसह जनता नगरमधील वीज वाहिनीचे निरिक्षण करण्यासाठी गेले होते. दरम्यान पथक निरिक्षण करत असतांना शेरू खान हा किराणा दुकानातून काठी घेवून चिरंजीलाल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना मारण्यासाठी धावून गेला. तसेच पथकाला अश्लिल शिवीगाळ केली. सदर वाद सुरू असतांना आणखी तिघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत तपासणी करण्यात अडथळा निर्माण केला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana News
Agricultural Store Theft: पत्रा कापून कृषी दुकानात चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद

सरकारी कामात अडथळा 

सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी चिरंजीलाल जाधव यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांनी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून तपस करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com