Buldhana News: ढग गडगडले, वारा सुटला अन् मतदान केंद्रावरील पत्रे उडाली; लोकांची पळापळ, निवडणूक अधिकारी जखमी

Buldhana Breaking News: जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील मतदान केंद्रावरील पत्रे उडाली अन् नागरिकांची धावपळ सुरू झाली. यावेळी छताचे लाकूड कोसळल्याने निवडणूक कर्मचारी जखमी झाले.
Buldhana Jamod Lok Sabha Voting News
Buldhana Jamod Lok Sabha Voting News Saam TV

संजय गडदे, साम टीव्ही बुलढाणा

Buldhana Jamod Lok Sabha Voting News

जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यात शुक्रवारी (ता. २६) सुरळीत मतदान सुरू होते. मात्र, अचानक ढग गडगडले. काही वेळातच सोसाट्याचा वारा सुटला. क्षणार्धात मतदान केंद्रावरील पत्रे उडाली अन् नागरिकांची धावपळ सुरू झाली. यावेळी छताचे लाकूड कोसळल्याने निवडणूक कर्मचारी जखमी झाले.

Buldhana Jamod Lok Sabha Voting News
Heat Wave Alert: महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा; मुंबई, ठाण्यासह कोकण तापणार, IMD कडून अलर्ट

डॉक्टर गजानन वानखेडे असं जखमी कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी (26 एप्रिल) मतदान पार पडलं. मतदानावेळी काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने नागरिकांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं.

तर काही भागात मतदानावेळी वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू झाल्याने मतदारांसह निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील मतदान केंद्रावर मतदान सुरू असताना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

वाऱ्याचा वेग जास्त असल्याने जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४५ आणि ४६ वरील टीनपत्रे अचानक उडून गेली. शाळेवरील तीन पत्रे हवेत उडून गेली. तर काही पत्रे मैदानावर जाऊन पडली. यावेळी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांसह निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

जीव वाचवण्यासाठी मतदार सैरावैरा पळत सुटले. दुसरीकडे ईव्हीएम मशीन बाहेर काढत असताना छताचे लाकूड कोसळल्याने निवडणूक अधिकारी डॉक्टर गजानन वानखेडे जखमी झाले. त्यांना प्राथामिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर वानखेडे यांना सुट्टी देण्यात आली.

Buldhana Jamod Lok Sabha Voting News
Wardha Loksabha Election: मतदान करताना फोटो क्लिक करून सोशल मीडियावर केला व्हायरल; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com