Buldhana Accident: बुलडाण्यात होमगार्डच्या बसला अपघात, १० जवान जखमी

Buldhana Home Guard Bus Accident: मुंबईतील निवडणूक (Mumbai Loksabha Election) बंदोबस्त संपवून परत जात असताना ही घटना घडली. हे सर्व होमगार्ड अकोल्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. जखमी जवानांवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Buldhana Accident: बुलडाण्यात होमगार्डच्या बसला अपघात, १० जवान जखमी
Buldhana Bus AccidentSaam Tv

अक्षय गवळी, अकोला

बुलडाण्यामध्ये (Buldhana) होमगार्डच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये १० होमगार्ड जवान जखमी झाले आहेत. मुंबईतील निवडणूक (Mumbai Loksabha Election) बंदोबस्त संपवून परत जात असताना ही घटना घडली. हे सर्व होमगार्ड अकोल्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. जखमी जवानांवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतला निवडणूक बंदोबस्त संपवून अकोल्याकडे परत निघालेल्या होमगार्डच्या बसला अपघात झाला. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराजवळ मध्यरात्री 2 च्या सुमारास हा अपघात झाला. हे सर्व होमगार्ड्स अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरचे आहेत. या बसमध्ये 26 होमगार्ड प्रवास करत होते. या अपघातामध्ये १० जवान जखमी झाले आहेत.

Buldhana Accident: बुलडाण्यात होमगार्डच्या बसला अपघात, १० जवान जखमी
Akola News : कापसाचे बियाणे घेताना महिलांमध्ये तुंबळ हाणामारी; अकोट येथील कृषी केंद्रावरील प्रकार

बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकली. यावेळी चालक बसच्या बाहेर फेकला गेल्यामुळे चालकाशिवाय बस अनियंभित झाली होती. यावेळी बसमधील अक्षय ठाकरे या जवानाने शिताफीने बस स्टेअरींगचा ताबा घेत बस नियंत्रित करीत थांबवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. अक्षय ठाकरेच्या साहसाचं कौतुक होत आहे.

Buldhana Accident: बुलडाण्यात होमगार्डच्या बसला अपघात, १० जवान जखमी
Buldhana Crime : संशयाचं भूत मानगुटीवर! बायकोची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; नवऱ्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

या अपघातामध्ये १० जवान जखमी झाले आहेत. या सर्व जखमी जवानांना अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसचालक अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप होमगार्ड जवानांनी केला आहे. अपघातग्रस्त बस ही अर्नाळा आगाराची आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Buldhana Accident: बुलडाण्यात होमगार्डच्या बसला अपघात, १० जवान जखमी
Pune Water Supply: पुणेकरांनाे, पाणी जपून वापरा! शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com