Buldhana News: अरे बापरे! महिलेच्या डोळ्यात निघाल्या चक्क ६० जिवंत अळ्या, डॉक्टरही हादरले

Doctor Found 60 live larvae In Women eye at Malgani: बुलढाण्यात एका महिलेच्या डोळ्यातून ६० जिवंत अळ्या काढल्याची घटना घडली आहे. मोरवाल हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केलीय.
महिलेच्या डोळ्यात जिवंत अळ्या
live larvae In Women eye Saam Tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

Buldhana: बुलढाण्याच्या मोरवाल हॉस्पिटलमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. डॉक्टरांनी एका महिलेच्या डोळ्यातून चक्क ६० जिवंत अळ्या काढल्या आहेत. चिखली येथील मोरवाल हॉस्पिटलचे संचालकांनी यांनी या महिलेचा डोळा वाचवला आहे. तब्बल या महिलेच्या डोळ्यातील अळ्या काढण्यासाठी तब्बल दोन तास लागल्याची माहिती मिळत आहे.

महिलेच्या डोळ्यात ६० जिवंत अळ्या

चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिला रुग्णाच्या डोळ्यातून चक्क ६० जिवंत अळ्या काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून अळ्या काढल्या ( Buldhana News) आहेत. या महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचविला आहे अळ्या काढताना डॉक्टर यांना तब्बल दोन तासांचा वेळ लागला असून एक-एक अळी काढावी लागली. मोरवाल हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केलीय.

मोरवाल हॉस्पीटलमधील घटना

विशेष म्हणजे या महीलेकडून (Eye Surgery) डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी कुठलीही फी सुद्धा घेतलेली नाही. मोलमजुरी करणाऱ्या या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात मातीचे ढेकुळ लागले होते. तेव्हापासून डोळ्यात त्रास होत होता. जास्त त्रास वाढल्यावर या महिलेने डॉ. स्वप्नील यांच्याकडे तपासणी केली होती. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अळ्या झाल्याचं डॉक्टरांना समजलं. डॉक्टरांनी तात्काळ त्या अळ्या काढण्याचं (live larvae In Women eye) ठरवलं.

महिलेच्या डोळ्यात जिवंत अळ्या
Eye Care Tips: सतत Screenवापरून डोळ्यांवर येतोय ताण? करा 'हे' घरगुती उपाय

२ तास चालली शस्त्रक्रिया

शस्त्रक्रियेदरम्यान पाहता पाहता डॉक्टरांनी तब्बल ६० जिवंत अळ्या त्यांच्या डोळ्यातून काढल्या. आता त्यांचा डोळ्यात कोणताही त्रास नसून डोळा सुद्धा सुखरूप आहे. यामुळे डॉक्टर मोरवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत (Morwal Eye Hospital) आहे. डोळा वरून चांगला दिसत होता, परंतु आता या महिलेच्या डोळ्यात एकूण साठ आळ्या निघाल्याचं समोर आलंय. परंतु यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टरांनी या महिलेचा डोळा वाचवला आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आलीय.

महिलेच्या डोळ्यात जिवंत अळ्या
Eyes Protection in Summer: उन्हाळ्यात डोळ्यांची कशी घ्याल काळजी? या आयुर्वेदिक Tips फॉलो करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com