Buldhana News : थकबाकी न भरल्याने १२८ गावे आजपासून पाण्याविना; तब्ब्ल १३ कोटी थकीत

Buldhana News : दोन्ही तालुक्यांना वान प्रकल्प धरणावरून जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यातील खारपान पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (Sangrampur) संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील १२८ गावांचा पाणीपुरवठा आजपासून बंद होणार आहे. या दोन्ही (Buldhana) तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीची थकीत रक्कम न भरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Buldhana News
Maharashtra Assembly Special Session : मराठा आरक्षणासाठीच्या विशेष अधिवेशनाआधी मनोज जरांगे कडाडले, सरकारला इशारा देत म्हणाले...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांनी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायतींना (Gram Panchayat) पत्रही बजावण्यात आले आहे. हे दोन्ही तालुके खारपानपट्टा म्हणून ओळखण्यात येतात. या दोन्ही तालुक्यात जमिनीतील पाणी पिल्याने किडनीच्या आजाराने हजारो मृत्यू झाले आहेत. म्हणून या दोन्ही तालुक्यांना वान प्रकल्प धरणावरून जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana News
Nandurbar Cotton Market : नंदूरबार जिल्ह्यात 70 हजार क्विंटल कापसाची विक्री, 50 कोटीची उलाढाल

आता या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीचे १३ कोटी ३९ लाख ९५ हजार रुपये न भरल्याने या दोन्ही तालुक्यातील १२८ गावांचा पाणीपुरवठा आजपासून बंद करण्यात आला आहे. यात संग्रामपूर तालुक्यातील ६९ गावे तर जळगाव जामोद तालुक्यातील ५९ गावे पाणीपुरवठा अभावी बंद राहतील. यामुळे मात्र नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com