Double Murder : दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला! पोटच्या गोळ्यानं आई-बापाचा खून केला, लाकडी दांड्याने जीव घेतला

Buldhana Crime : जमीन अन् संपत्तीसाठी पोटच्या पोराने आई आणि बापाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील बुलढाणामध्ये घडली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली.
Pune
Pune Saam Tv
Published On

Buldhana Double Murder son killed father and mother : दुहेरी हत्याकांडाने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. शेतीमधील वाट्यासाठी पोटच्या गोळ्याने जन्मदात्या आई आणि बापाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. गणेश महादेव चोपडे असे आरोपी मुलाचे नाव आहे. महादेव त्रंबक चोपडे आणि कलावती महादेव चोपडे असे मृत नवरा-बायकोची नावे आहेत. चिखलीमधील किन्ही सवडतं, येथे ही धक्कादायक घटना घडली. दुहेरी हत्याकांडानंतर चिखलीमध्ये खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येतेय. कलयुगी मुलाला कठोर शिक्षा व्हावी, अशी चर्चा चिखली तालुक्यात सुरू आहे.

शेतीच्या हिस्से वाटपाच्या वादातून पोटच्या मुलानेच आई-वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील किन्ही सवडत येथे शनिवारी रात्री घडली. महादेव त्रंबक चोपडे (वय ७५) व त्यांची पत्नी कलावती महादेव चोपडे (वय ७०) यांची हत्या झाली. मुलगा गणेश महादेव चोपडे (वय ३५) याने शेतीचे हिस्से वाट्यावर वाद घातला. त्याने रागाच्या भरात लाकडी दांड्याने वृद्ध माता आणि पित्याला जबर मारहाण करून जागीच खून केला. आरोपी गणेश याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Pune
Extramarital Affairs : कंपनीची मालकीन विवाहित कर्मचाऱ्याच्या प्रेमात बुडाली, घटस्फोटसाठी ३ कोटी दिले, वर्षभरानंतर...

चिखली तालुक्यातील या घटनेने बुलढाणा जिल्हा पुन्हा हादरला आहे. चार दिवसापूर्वी खामगाव येथे एका प्रेमी युगलाची हत्या झाली होती. आता ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडाने बुलढाणा हादरलेय. या घटनेची माहिती मिळताच मुसळधार पावसात अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री साडेनऊच्या सुमारास फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा व रक्तनमुने घेण्याचे काम केले होते. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात खूनांच्या घटनांत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune
Actor Vijay Rally Stampede : १७ महिला, ९ मुलांसह ३९ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू, ५१ जण ICU मध्ये, थलापति विजयच्या रॅलीत अनर्थ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com