Buldhana : घरकुलाचे अनुदान वाढवून द्या; स्वाभिमानीचे आमरण उपोषण

बुलढाणा जिल्ह्याच्या आदिवासी भागातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील 34 हजार लाभार्थ्यांचे घरकुल निधी अभावी रखडले आहे.
Buldhana : घरकुलाचे अनुदान वाढवून द्या; स्वाभिमानीचे आमरण उपोषण
Buldhana : घरकुलाचे अनुदान वाढवून द्या; स्वाभिमानीचे आमरण उपोषणSaamTvNews
Published On

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या आदिवासी भागातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील 34 हजार लाभार्थ्यांचे घरकुल निधी अभावी रखडले आहे. मात्र, जिल्हा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghtana) केला आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागविण्याचे काम सरकारचे आहे. मात्र, या तीनही मूलभूत सुविधांपासून हजारो नागरिक वंचित आहेत.

हे देखील पहा :

घरकुल (Gharkul) योजनेच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना तात्काळ नमुना ड प्रपत्र देऊन घरकुल मंजूर करावे व त्यासाठी लागणारे अनुदान 3 लाख रुपयापर्यंत वाढवून द्यावे. तसेच या घरकुल योजनेत विशेष बाब म्हणून दिव्यांगांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा या मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनंत मानकर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी संग्रामपूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण (Hunger Strike) सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Buldhana : घरकुलाचे अनुदान वाढवून द्या; स्वाभिमानीचे आमरण उपोषण
नाशिक हादरलं! वडिलांसोबत फिरायला गेलेल्या दहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
Buldhana : घरकुलाचे अनुदान वाढवून द्या; स्वाभिमानीचे आमरण उपोषण
नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी सहलीस गेलेल्या भाजप नगरसेविकेचा हार्ट अटॅकने मृत्यू!
Buldhana : घरकुलाचे अनुदान वाढवून द्या; स्वाभिमानीचे आमरण उपोषण
Petrol : लवकरच पेट्रोल १२५ पार होणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com