

संजय जाधव, प्रतिनिधी...
Buldhana News: बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथे माहेरी असलेल्या पत्नीला व सासूला जावयाने चाकूने मारून जखमी केल्याची घटना घडली आहे, या प्रकरणी खामगाव येथील आरोपी जावई नितीन कैलास तायडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News In Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी नितीन तायडे आणि त्याची पत्नी पुजा तायडे दोघांमध्ये वाद होते. त्यामुळे पत्नी पुजा माहेरी राहत होती. पतीसोबत वाद असल्याने पुजा तायडेने न्यायालयाकडे पोटगीसाठी अर्ज केला होता.
याचाच राग मनात धरुन नितीन तायडेने पत्नी पुजावर चाकूने हल्ला केला. यावेळी वाचवण्यासाठी आलेल्या सासूवरही त्याने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात माय-लेकी दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी पत्नी पुजा तायडेच्या तक्रारीवरुन आरोपी नितीन तायडे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.