Buldhana Accident : धावत्या बसचा अचानक ब्रेक फेल झाला, ३० प्रवाशांचा जीव टांगणीला ; चालकाने थेट...

Buldhana ST Bus Accident News : बुलढाण्यात वरुड परिसरात एसटी बसचे ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. ३० प्रवाशांनी भरलेल्या बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
Buldhana Accident : धावत्या बसचा अचानक ब्रेक फेल झाला,  ३० प्रवाशांचा जीव टांगणीला ; चालकाने थेट...
Buldhana ST Bus Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • बुलढाण्यात एसटी बसचे ब्रेक फेल होऊन अपघात

  • ३० प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित झाली

  • चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

  • दुचाकीस्वाराचाही जीव थोडक्यात वाचला

  • एसटीच्या जुन्या बसेसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

संजय जाधव, बुलढाणा

बुलढाण्यात ३० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने बस अनियंत्रित होऊन अपघात झाला. सदर अपघात हा धाड–बुलढाणा मार्गावरील वरुड परिसरात, शरद पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाजवळ घडला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरुड–सोयगाव–जामठी मार्गावर धावणारी एसटी बस क्रमांक MH 20 BL 1806 अचानक अनियंत्रित झाली.यावेळेस या बसधून सुमारे ३० प्रवासी प्रवास करत होते. मोठा आवाज झाल्यानंतर ब्रेक पाइप फुटल्याने बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक एन. आर. शिपने यांच्या लक्षात आले.परिस्थिती गंभीर असतानाही चालकाने प्रसंगावधान राखत गिअर बदलून बसचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला.

Buldhana Accident : धावत्या बसचा अचानक ब्रेक फेल झाला,  ३० प्रवाशांचा जीव टांगणीला ; चालकाने थेट...
Jalgaon Mayor : जळगाव महापालिकेच्या महापौरपदी महिलाराज, ४ महिलांचं नाव चर्चेत; वाचा संपूर्ण

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घरे, नागरिक आणि वाहने असल्यामुळे बस वळवणे शक्य नव्हते. अखेर संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी चालकाने समोर असलेल्या गजानन माघाडे यांच्या घराजवळील विद्युत पोलच्या ताणाला बस धडकवली. त्यानंतर बस रस्त्याच्या उजव्या बाजूला डोंगरे यांच्या शेतातील कडब्याच्या गंजीवर जाऊन थांबली. या अपघातात बसखाली आलेल्या दुचाकीस्वाराचाही जीव थोडक्यात वाचला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन त्याला सुरक्षित बाहेर काढले. दुचाकीस्वार सुखरूप असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Buldhana Accident : धावत्या बसचा अचानक ब्रेक फेल झाला,  ३० प्रवाशांचा जीव टांगणीला ; चालकाने थेट...
Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली, तरुणीचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. केंद्रे साहेब आणि पोलीस कॉन्स्टेबल माळी यांनी पंचनामा करून पुढील कारवाई केली. यावेळी परिसरातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि नागरिकांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे एसटीच्या जुन्या व भंगार बसेसचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com