Buldhana News: गॅसने भरलेल्या ट्रकची टपरीला धडक; मोठा अनर्थ टळला

गॅसने भरलेल्या ट्रकची टपरीला धडक; मोठा अनर्थ टळला
Buldhana News
Buldhana NewsSaam tv

बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव येथील फरशी परिसरात गॅस सिलेंडरने भरलेल्या एका ट्रकने फरशी परिसरातील पानटपरीला जोरदार धडक (Accident) दिली. या घटनेमुळे अनेकांच्‍या हृदयात धडकी भरली होती. (Live Marathi News)

Buldhana News
Viral Video: इंदुरीकर महाराजांच्‍या कीर्तनात ‘हायी झुमकावाली पोर’; इंदुरीकरांनी कीर्तनही थांबवून चिमुकल्याला स्टेजवर बोलवून पुन्हा नाचायला लावले

बुलडाणा शहरातून जड वाहनांना प्रवेश बंदी असतांना देखील हा गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक फरशी भागात शिरला होता. वेगाने जात असलेल्‍या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे हा ट्रक चक्क एका टपरीवर जाऊन आदळला. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणत गॅसने भरलेले सिलेंडर होते. त्यामुळे मोठा स्फोट होऊन याठिकाणी मोठी दुर्घटना घडली असती.

सुदैवाने जीवितहानी टळली

ट्रकने टपरीला धडक दिली. यावेळी सुदैवाने टपरीमध्ये कुणी नव्‍हते. यामुळे जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त ट्रक चालक हा पळून जाण्याच्‍या प्रयत्‍नात होता. मात्र स्थानिक नागरीकांनी चालकला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com