Latur News: स्मृतिभ्रंश झाल्याने भाऊ २५ वर्ष बेपत्ता; बहिणीने सांगितली अंगावर शहारे आणणारी घटना

लातूरच्या दोन तरुणांमुळे एका वृद्ध स्मृतिभ्रंश झालेल्या आजोबांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत झाली आहे.
Latur News
Latur NewsDeepak Kshirsagar
Published On: 

दीपक क्षीरसागर

Latur News: स्मृतिभ्रंश आजाराने आज अनेक वृद्ध व्यक्ती त्रस्त असल्याचे दिसते. अशात या आजारात अनेक जण घरातून निघून गेले आहेत. ते आता कुठे आहेत? कोणत्या परिस्थितीत आहेत याची कुटुंबीयांना काहीच माहिती नाही. अशात असे रुग्ण सापडणे देखील फार कठीण असते. मात्र लातूरच्या दोन तरुणांमुळे एका वृद्ध स्मृतिभ्रंश झालेल्या आजोबांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत झाली आहे. (Latest Latur News)

काही महिन्यांपूर्वी लातूर शहरात विमनस्क अवस्थेत फिरणारे ६१ वर्षीय बशीर सय्यद यांना आपण कोण आहोत, याचे भान नव्हते. केस दाढी वाढलेली, मळकटलेले कपडे आणि मिळेल तिथे निवारा अशा अवस्थेत असताना कुत्र्यांनी चावा घेतला, जखमा झाल्या, हातामध्ये अळ्या पडल्या.

याच स्थितीत लातूरच्या दोन ध्येयवादी तरुणांनी बशीर यांना जवळ घेतले. प्रथमोपचार करून बुलढाणा येथील प्रकल्पात पाठविले. शेवटी पाच महिन्यांच्या मानसोपचारानंतर बशीर सय्यद यांना आग्रा येथील घर आठवले आणि २५ वर्षांनी त्यांना बहिण, नातेवाईक भेटले.

लातूरमध्ये ५ सप्टेंबर, २०१२ रोजी गणेशोत्सवादरम्यान छत्रपती शाहू महाराज चौक येथे जखमी झालेले बशीर आढळून आले होते. साधारणपणे २५ वर्षांपूर्वी ते आग्रा येथील (उत्तर प्रदेश) आपल्या घरून बाहेर पडल्यानंतर स्मृतिभ्रंशामुळे हरवले होते. कुटुंबीयांनी प्रचंड शोधाशोध केली. मात्र, ते सापडले नाहीत.

Latur News
Latur News : औसातील लॉजवर खुलेआम वेश्याव्यवसाय; कॉलेज तरूण-तरुणीही...; त्रासलेल्या लोकांनीच उचललं मोठं पाऊल

मिळेल ते अन्न आणि कोणत्याही जागेवर मुक्काम करत बशीर सय्यद लातूरात पोहोचले होते. अनेक दिवस ते उड्डाण पुलाजवळ रस्त्याच्या कडेला दिसत होते. त्यावेळी राहुल पाटील आणि मुस्तफा सय्यद या दोन तरुणांनी बशीर यांच्या जखमांवर प्रथमोपचार केले. पुढील उपचार आणि मानसोपचारासाठी दिव्य सेवा फाउंडेशनचे अशोक काकडे यांच्या प्रकल्पात पाठविले.

Latur News
Latur News: घोड्यावरून वरात पोहचली महावितरणच्या दारात; डिमांडनोट भरूनही विज जोडणी नसल्याने शेतकऱ्यांचा मोर्चा

जवळपास पाच महिने त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना आग्रा येथील आपले घर आणि पत्ता आठवला. ही माहिती बशीर यांची बहिण नगमा आणि नातवाला देण्यात आली आणि त्यांची भेट झाली. अशात आता दिव्य सेवा फाउंडेशनचे अशोक काकडे आणि त्या दोन तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.