जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एक गुन्हा बौद्ध धर्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल करण्यात आला आहे तर दूसरा गुन्हा जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेश भंग केल्या प्रकरणी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलिस अधिक तपास करीत असून या गुन्ह्यांमुळे आ. जिते द्र आव्हाड यांच्या आडचणीत वाढ झाली आहे.
अजित पवार यांचे आव्हान अंजली दमानिया यांनी स्वीकारले
तुम्ही तुमची नार्को टेस्ट करा
जर असं खरं ठरलं तुमचा आणि विकासक विशाल आगरवालचा काही संबंध नाही
तुम्ही यात काही केलेलं नाही
माझा तुम्हाला शब्द आहे यापुढे मी कोणतेही गोष्टीवर वाच्यता करणार नाही
मी जे प्रश्न लिहून देईल त्यावरच मार्को टेस्ट झाली पाहिजे
पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण
ड्रायव्हर गंगाराम याचा मोबाईल पोलिसांनी केला जप्त
ड्रायव्हर गंगाराम याचा मोबाईल विशाल आणि सुरेंद्र अगरवाल यांनी हिसकावून घेतला होता
विशाल अगरवाल यांच्या निवस्थनातून च हा मोबाईल गुन्हे शाखेने काढला शोधून
या मोबाईल मध्ये नेमके कोणाचे फोन आणि मेसेज आहेत याचा तपास सुरू
पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अपडेट
चौकशी समितीचा अहवाल प्राप्त
डॅाक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे ससुनच्या डीन पदाचा अतिरीक्त कार्यभार
ससून रुग्णालय चे डीन विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची शिफारस
म्हस्के बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन
ससुनचे प्रमुख म्हणुन या प्रकरण गांभिर्याने घेतले नाही. संस्थेवर योग्य नियंत्रण ठेवले नाही, असा ठपका
ठेवत सक्तीच्या रजेवर
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या महाड येथील प्रकरणानंतर ठाण्यातील आव्हाड यांच्या नाद या बंगल्याच्या बाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. उद्या देखील भाजप चा वतीने आंदोलन केल जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात रेल्वेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शहाजी निकम यांची सलग दोन दिवस चौकशी
पहिल्या तीन होर्डिंगच्या तुलनेत
चौथ्या (पडलेल्या) होर्डिंगमधून लोहमार्ग पोलिसांना सर्वाधिक रक्कम
उर्वरित तीन होर्डिंगमधून १३ लाखाची रक्कम मिळत होती तर चौथ्या होर्डिंगमधून ११ लाखाहून अधिक रक्कम ही रेल्वे पोलिसांच्या खात्यात जमा होत असल्याच चौकशीतून माहिती पुढे
डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं
डॉक्टर तावरे आणि हळनोर यांच्यावर निलंबनाची कारवाई
अतुल घटकांबळे यांच्यावरही निलंबनाची कारवाई
चौघांवर कारवाई करण्यात आलीय
विदर्भातील नागपूरसह भंडारा आणि वर्धा येथेही 45 अंश सेल्सियस तापमानाची नोंद
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात सर्वाधिक 46.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद
तर चंद्रपूर 44.2,गोंदिया 44,गडचिरोली 44 अंश सेल्सियस कमाल तापमान
सरासरीपेक्षा 1 ते 3 अंशांनी तापमानात वाढ
हवामान विभागाने दिलेल्या उष्णतांच्या अलर्ट मध्ये आणखी दोन दिवसाची वाढ, 31मे पर्यंत विदर्भात उष्णतेची लाट राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज
दत्तनगर येथील सिद्धी चायनीज दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट
नऊ जण जखमी
शासकीय व खाजगी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू
सांगलीच्या जत येथील भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड खुन प्रकरणातील संशयित आरोपी भाजपाचे माजी नगरसेवक उमेश सावंत अखेर न्यायालयात हजर झाला आहे.गेल्या दीड वर्षांपासून उमेश सावंत हा फरार होता.सांगली पोलिसांच्याकडू उमेश सावंत याला फरार घोषित करून बक्षीस देखील जाहीर केले होते. अखेर सावंत हा सांगली न्यायालयात स्वतःहून हजर झाला,यानंतर सांगली पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीन बाबासाहेबांचा फोटो फाडून त्यांचा अपमान केलाय
बाबासाहेबांची डुप्लिकेट कॉपी करण्यासाठी त्यांनी आज महाडला मनुस्मृचीच दहन करण्याचा प्रयत्न केला
जितेंद्र आव्हाडला जाब विचारण अवश्यक आहे
जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो
आव्हाड यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे
याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून त्यांना अटक करावी अशी मागणी करणार आहे
लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी राज्यातील आंबेडकरी जनतेची मागणी आहे
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याला आमचा शंभर टक्के विरोध - आमदार राम सातपुते
भाजप आणि भाजप अनुसुचित मोर्चाचे पुण्यात निषेध आंदोलन
राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॅाक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन
जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या घटनेचा निषेध
राजकीय भूमिका मांडली आहे
धंगेकर यांनी सगळ मांडल आहे
गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे
आरोपी हा आरोपी असतो
गडगंज असो किंवा काहीही असो
त्याचे सगळे पुरावे आहेत,त्याची नोंद होत नाही,रक्त नमुने बदलले जातात
हे सगळ प्रकरण समस्यास्पद आहे पोलिसांच्या दिरंगाईमुळे हे सगळं झाले
आता हे प्रकरण या मागे राजकीय पाठबळ आहे हे उघडकीस आले आहे
जधानी दिल्लीने आज मागच्या 5 दिवसातील तापमानाचा रेकॉर्ड मोडला
राजधानी नवी दिल्लीत आज 52.3 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद
दिल्लीच्या मंगेशपुर भागात हवामान विभागाने या तापमानाची केली नोंद
दिल्लीत नोंदवलं गेलेलं हे तापमान देशभरातील सर्वाधिक तापमान आहे
दिल्लीतील इतरही ठिकाणी 45 डिग्री सल्सिअसच्या पुढे आज तापमान
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना
आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत वाढ
एका दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात गुन्हे शाखेला यश
आज पुन्हा भावेश भिंडेला किल्ला कोर्टात हजर करण्यात आल होत
कल्याणी नगर अपघात प्रकरणातील ससून मधला आरोपी अतुल घटकांबळे याला पुणे पोलिसांनी ससून हॉस्पिटलमध्ये आणलं होतं
त्याच्याकडून सर्व प्रकारची माहिती घेतली
ब्लड सॅम्पल्स बदलल्यानंतर कुठे फेकलेस ही सर्व माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात आलेली आहे
आणि त्याला पुन्हा एकदा पोलीस आयुक्तालयात घेऊन गेले आहेत
मुंबई शिक्षकसाठी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळावा यासाठी नाना पटोले यांची भेट घेतली
आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहे
कायम ही निवडणूक आम्ही लढवतो त्यामुळे येथे आमचा दावा आहे
काँग्रेस पक्षाने पाठींबा द्यावा ही मागणी केली
आम्ही उद्धव ठाकरेंना पत्र दिलं, त्यांच्या नेत्यांशीही चर्चा केली आहे
विशाल अग्रवाल याच्या अडचणीत वाढ
अपघाताच्या गुन्ह्यात विशाल अग्रवाल याच्या जामीन अर्जावर १ जूनला होणार सुनावणी
पुणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
विशाल अग्रवाल यांनी केला होता जामिनासाठी अर्ज
आरोपी मलय मेहता यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ
31 मे पर्यंत सुनावली पोलीस कोठडी
मलय मेहता सह त्याच्या पत्नी स्नेहा मेहता हिला ही सुनावली पोलीस कोठडी
कल्याण न्यालयात सर न्यायधीश श्रीमती एस एस राऊळ याच्या दालनात सुरु होती सुनावणी
समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष
कपिल पाटील नाना पटोले यांच्या भेटीला काँग्रेस पक्ष कार्यालयात दाखल
मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक बाबत चर्चा करणार
मुंबईत पाणीकपात सुरु होणार
मुंबई महानगरात गुरूवार दिनांक ३० मे २०२४ पासून ५ टक्के पाणी कपात, तर बुधवार दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणी कपात
जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय
सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात तुरुंगातून बाहेर सोडण्याची याचिकेत मागणी
माफीचा साक्षीदार बनलो असतानाही तुरुंगात डांबलेय वाझेचा सीबीआयवर आरोप
उच्च न्यायालयाने सीबीआय आणि तळोजा तुरुंग प्रशासनाला बजावली नोटीस
14 जूनला नियमित खंडपीठापुढे होणार सुनावणी
कृषी पंपांना जलमीटर बसवण्याची सक्ती रद्द करा, वाढीव पाणी पट्टी मागे घ्या, वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंदणी करण्याची प्रक्रिया थांबवा यासह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आज एल्गार पुकारला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग लगत पंचगंगा पुला नाजिक असणाऱ्या सर्विस रोडवर हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, डॉ. भारत पाटणकर, संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील आवश्यक कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणामध्ये एकूण तीन गुन्हे दाखल झालेले आहेत.
पालघर रेल्वे स्थानकावरील रुळावर घसरलेले मालगाडीचे डबे बाजूला करण्याचं काम पूर्ण झालं आहे . सध्या पश्चिम रेल्वेकडून रेल्वे दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू झाल्या आहेत . डहाणू विरार लोकल सेवा ठप्प आहे . अजूनही चार ते पाच तास पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत होण्यास लागणार आहे .
विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करून शेततळ्यावर आंघोळीसाठी गेलेल्या दोघे सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या निफाड येथील नांदुर्डी रोडवर असलेल्या ढेपले वस्तीवर घडली आहे.
प्रवरा नदीत एकजण बुडाला आहे. राहाता तालुक्यातील कोल्हार गावातील घटना आहे. पोहायला गेलेल्या तीघांपैकी एकजण बुडाल्याचं समोर आलं आहे.
पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक ससून रुग्णालयात दाखल झाले आहे. पोलिसांनी घेतली अधीक्षक यल्लापा जाधव यांच्याकडून रुग्णालय प्रशासनाची माहिती घेतली आहे. जाधव यांच्या अख्यारीत ससून सर्वोपचार रुग्णालयाचे सर्व अधिकार आहेत.
विशाल अग्रवाल व सुरेंद्र अग्रवाल यांनी जामीनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. दोघांच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. विशाल अग्रवाल व सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याने सध्या ते पोलिसांच्या ताब्यात आहेत.
पुण्यातील भांडारकर रोडवर असणाऱ्या एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.
या आगीच कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल दोघांनाही चौकशीसाठी पोलिस आयुक्तालय येथे आणण्यात आल आहे. चालकाला धमकवणे प्रकरण आणि ससून डॉक्टर प्रकरणी तपास गुन्हे शाखा करत आहे. विशाल आणि सुरेंद्र अग्रवालची समोरासमोर चौकशी होणार आहे.
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शरजील इमामलला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जास्तीत जास्त 7 वर्षांच्या शिक्षेपैकी निम्मी शिक्षा भोगली असल्याच्या कारणावरून जामीन मागितला होता. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि जामिया परिसरात केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणानंतर शरजीलवर गुन्हा दाखल केला होता. शरजीलवर देशद्रोह आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनास्थळाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. विद्यार्थी आणि प्रवासी यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ज्यादा बसेस सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. परीक्षा केंद्रांवर पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याची अजून तरी माहिती नाही, मात्र तशी माहिती मिळाल्यास योग्य ती कारवाई करणार, अशी माहिती पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.
लाचलुचपत विभागाने दोन पोलिसांवर वाळू वाहतूकदारांकडून 15 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली आहे. एसीबीचे पथक आल्याची कुणकुण लागताच स्वीकारलेली लाचेची रक्कम घेऊन पोलिसांनी पोबारा केला. गंगापूर पोलीस उपविभागीय कार्यालयात दोघेही पोलीस हवलदार कार्यरत होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनाला ७ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. त्यामुळे केजरीवाल यांना आता 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना रायगड पोलिसांमार्फत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. आज आमदार जितेंद्र आव्हाड महाडमध्ये मनुस्मृती दहनाचे आंदोलन करत आहेत. आव्हाड हे महाडमधील क्रांतीस्तंभ येथे हे आंदोलनासाठी येत आहेत. या आंदोलनाला परवानगी नाही, कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न, धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडून जमावबंदी आदेशाबाबत नोटीस बजावण्याची शक्यता आहे.
पालघर मालगाडी अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे डी आर एम नीरज वर्मा यांनी दिली. तसेच या प्रकरणी पाच जणांच्या उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात येणार आहे. संध्याकाळी साडेतीन ते चार वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याचाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. डॉ. अजय तावरे हा पोलिसांकडून विविध गुन्ह्यांच्या तपासात मदतीसाठी देखील पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी ‘अकस्मात मृत्यू’च्या गुन्ह्यांच्या प्रलंबित तपासाचा आढावा घेतला होता. त्यावेळी जवळपास अकस्मात मृत्यूचे १४०० गुन्हे तपासावर प्रलंबित असल्याचे समोर आले होते. पोलीस कर्मचाऱ्यांकडून तावरे याने १०० ते २०० रुपये देखील घेतल्याचे तपासात समोर आल्याचे पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला तात्काळ जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या "त्या" सदस्याच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. महिला आणि बाल न्याय मंडळाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यानी दिले चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
रस्त्यांच्या कामातील दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मुंबई महापालिकेचे अतिरिक्त पालिका आयुक्त बांगर यांनी दिला आहे. रस्त्यांची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास कंत्राट रद्द करणार, असा आदेशही बांगर यांनी दिला. मुंबई महानगरात ठिकठिकाणी रस्ते बांधणी आणि दुरुस्तीची कामांची बांगर यांनी ठिकठिकाणी पाहणी केली.
पाकिस्तानने 1999 साली पाकिस्तानने लाहोर कराराच उल्लंघन केलं, ती आपली चूक होती, अशी कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे. 25 वर्षांनंतर शरीफ यांनी कबुली दिली आहे. पाकिस्तानने केलेल्या अणुचाचणीला 26 वर्ष पूर्ण झाले होते, त्या कार्यक्रमात त्यांनी कबुली दिली.
पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अपडेट समोर आली आहे.
डॉ अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सॲप कॉल झाला आहे.
संशय येऊ नये म्हणून नॉर्मल फोन कॉल न करता व्हॉट्सॲपचा वापर केला जायचा.
डॉ. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सॲपवरून संभाषण
दोघांचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ (कॉल डिटेल रेकॉर्ड)वरून समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विचित्र अपघात झाला आहे. कारचा नियंत्रण सुटल्याने भरधाव कार वाहनांना उडवत पेट्रोल पंपावर धडकली. यात कारने तीन चारचाकी आणि दुचाकीस्वाराला उडवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.