Today's Marathi News Live : हिंगोलीच्या भूमीपुत्रांला सिक्किममध्ये वीरमरण, कर्तव्य बजावताना दुर्घटना

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (22 may 2024) : देश विदेश तसेच राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा एका क्लिकवर
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा एका क्लिकवर
Today's Marathi News Live Saam tv

हिंगोलीच्या भूमीपुत्रांला सिक्किममध्ये वीरमरण, कर्तव्य बजावताना दुर्घटना

हिंगोलीच्या भूमिपुत्रांला सिक्कीम राज्यातील वीरमरण

अंकुश वाहुळकर असे सैन्य दलातील जवानाचे नाव

वाहुळकर हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावचे रहिवासी

कर्तव्य बजावताना एका दुर्घटनेत वीरमरण

ज्यांना नेता निवडता येत नाही ते देश काय चालवणार: देवेंद्र फडणवीस यांची इंडिया आघाडीवर टीका

आप म्हणजे घोटाळेबाजांचा पक्ष

केजरीवाल जेल मधुन बाहेर आल्यापासून स्वतंत्रसेनानी असल्यासारखं स्वागत होत आहे

मोदी म्हणजे वादा पूर्ण करणारी व्यक्ती

मोदी यांनी कोरोणा लस दिली नसती तर आपण इथे बसलो नसतो

मॉरिशसच्या पंतप्रधान यांनी म्ला सांगितल की मोदींना धन्यवाद द्या कारण त्यांनी लस दिली नसती तर माझा देश वाचला नसता

जे लोक नेता निवडू शकत माहीत ते देश काय चालवू शक्यता ?

दिल्ली पोलीस करणार अरविंद केजरीवाल यांच्या आई आणि वडिलांची चौकशी

दिल्ली पोलिस उद्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आई आणि वडिलांची चौकशी करणार

अरविंद केजरीवाल यांनीच ट्विट करून दिली माहिती

अरविंद केजरीवाल ट्विट -

कल दिल्ली पुलिस मेरे बूढ़े और बीमार माता पिता से पूछताछ करने आएगी।

खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाण प्रकरणी ही चौकशी होणार

यवतमाळ जिल्ह्याला सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पाऊस, चक्रीवादळाचा तडाखा

यवतमाळ जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस,चक्रीवादळा सारखा पाऊस

अवकाळी पावसाची दुसर्‍या दिवशीही यवतमाळच्या अनेक भागात पाऊस

विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस,आर्णी,घाटंजी,झरी-जामणी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

अनेक भागात अवकाळी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत

निवडणुकीच्या दिवशी झालेली उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासून पाहणार

निवडणुकीच्या दिवशी उद्धव ठाकरे यांची झालेली पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयोग तपासून पाहणार

मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगांना टार्गेट केल्याची भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली होती तक्रार

केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहे

आता राज्य निवडणूक आयोग या संदर्भात उद्धव ठाकरे यांची संपुर्ण पत्रकार परिषद तपासून पाहणार

यात वादग्रस्त असल्यास निवडणूक आयोग यावर कारवाई करणार

उजनी धरणात बुडाली 7 प्रवाशांची बोट; 24 तासानंतरही शोधमोहीम

उजनी धरणात भीमा नदी पात्रात मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता च्या सुमारास बोट बुडालीय. या बोटीत सात प्रवासी होते त्यापैकी सहा जण अद्यापही बेपत्ता आहेत. तब्बल 24 तास ओलांडून गेले तरीही त्यांचा शोध लागलेला नाही.काल रात्रीपासून त्यांचा शोध घेतला जातोय.आज सकाळपासून एनडीआरएफ पथक त्यांचा शोध घेत होतं.

दिल्लीतील 7 ही जागा भाजप जिंकेल, देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

दिल्लीतील 7 जागा भाजप जिंकेल

प्रवीण खंडेलवाल यांचा विजय निश्चित आहे

मी भाजपचा कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षाने सांगितल्यानंतर मी प्रचाराला आलोय

पुढचे 2 दिवस मी दिल्लीत प्रचार करणार

अरविंद केजरीवाल यांना 2 तारखेपर्यंत काहीही बोलण्याचा अधिकार आहे... 4 तारखेला निकाल दिसेल काय आहे तो

निवडणूक बंदोबस्त संपवून निघालेल्या होमगार्डच्या बसला अपघात, १० जण जखमी

मूंबईतला निवडणूक बंदोबस्त संपवून अकोल्याकडे परत निघालेल्या होमगार्डच्या बसला अपघात. यात 10 होमगार्ड जवान जखमी झालेय. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराजवळ रात्री 2 च्या सुमारास हा अपघात झालाय. हे सर्व होमगार्ड्स अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरचे आहेय.

गजानन किर्तीकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता

शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता.

लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी वक्तव्य आणि संभ्रम निर्माण केल्या प्रकरणी शिवसेनेकडून कारवाईची शक्यता.

शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी आज शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची केली मागणी.

पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

पिंपरी चिंचवड शहरात आज संध्याकाळी पुन्हा एकदा दमदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाच्या रिमझिम सरी आज पिंपरी चिंचवड शहरात बरसल्या आहेत. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाळ्या पासून पिंपरी चिंचवडकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला दररोज बसतोय वळवाच्या पावसाचा तडाखा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस.

कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, तालुक्यात अवकाळी पाऊस.

ढगांच्या गडगडाटासह पाऊस

गरमीने हैराण झालेल्या नागरीकांना काहीसा दिलासा.

पुण्यातील घटनेचा राजकारणासाठी वापर होणं दुर्दैवी: प्रविण दरेकर

अशा दुर्दवी घटनेचा राजकारणासाठी वापर करण हे योग्य नाही. फडणवीस यांनी स्वत जाऊन कोणालाही पाठीशी घालणार नाही असं सांगितलं. कोर्टाच्या निर्णयावर पण टिपणी त्यांनी केली. पबवर कारवाई झाली आहे. विरोधक राजकारण करताना दिसत आहेत. पोलिसांनी कठोर भुमिका घेतली आहे. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही.

Pune Hit And Run Case : विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी न्यायालयाच्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर काढलं

आरोपी विशाल अगरवाल याला पुणे पोलिसांनी न्यायालयाच्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर काढले

वंदे मातरम संघटनेने विशाल अग्रवाल याच्यावर शाही फेकलाच्या करा नंतर पुणे पोलिसांनी लढवली शक्कल

न्यायालयाची सुनावणी झाल्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल याला दुसऱ्या गेटमधून काढले बाहेर

पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवाल यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

विशाल अगरवाल याला २४ पर्यंत पर्यंत पोलीस कोठडी

पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवाल यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

अगरवाल याच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना सुद्धा

पुणे सत्र न्यायालय ने सुनावली कोठडी

विशाल अगरवाल हे अल्पवयीन तरुणाचे वडील

१९ तारखेला पुण्यातील कल्याणीनगर भागात झाला होता अपघात

या अपघातात २ जणं मृत्युमुखी पडले होते

हिट अँड रन प्रकरण; असीम सरोदे यांची आज सुद्धा हस्तक्षेप याचिका

असीम सरोदे यांची आज सुद्धा हस्तक्षेप याचिका

पुणे नायायलायात सुरू असलेल्या हिट अँड रन प्रकरणी असीम सरोदे यांनी केले intervention

या प्रकरणी २ वेगळ्या एफ आय आर का दाखल केल्या? असीम सरोदे यांनी केली याचिका

सरकारी वकिलांनी विशाल अगरवाल यांची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली

विशाल अगरवाल यांच्या वकिलाचा युक्तिवाद

आरोपी फरार नव्हता, ४१ A ची नोटीस दिली नव्हती

पुण्यातील ते पब हे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केले आहेत पोलिसांनी नाही

तिथे जप्त केलेल्या सर्व सामग्री सुरक्षित आहेत

आरोपीला पोलीस कोठडी ची आवश्यकता नाही

निवडणूक आयोगाची जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस

निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या स्टार प्रचारकांनी विचारपूर्वक विधान करावीत"

"धर्म, भाषा, जात या विषयावर विधान करू नका"

संविधान, सैनिक यांच्यावर टिपण्णी करू नका - निवडणूक आयोग

आयोगाच्या दोन्ही पक्षांना सूचना

Baramati News : भीमा नदीत बुडालेले ६ जण अद्याप बेपत्ता, पाण्यात दुचाकी सापडली

बारामती:

भीमा नदीपात्रात बुडालेली एक दुचाकी सापडली

पाण्यात सोडलेल्या कॅमेरात दिसून आली दुचाकी

बुडालेले सहा जण अद्याप बेपत्ता

Mumbai News : मुंबईत मतदानाचा टक्का घसरला, मविआचे उमेदवार निवडणूक कार्यालयात जाणार

मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची घेणार भेट

साडेतीन वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना भेटणार आहेत

मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मतदान संथगतीने झालं.

मतदानाचा टक्का सुद्धा घसरला.

शिवाय अनेक ठिकाणी मतदारांसाठी सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या.

अशा प्रकारच्या अनेक तक्रारी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये आहेत.

या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उमेदवार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात जाणार आहेत.

पुणे हिट अँड रन प्रकण : आरोपी मुलाला जेल की बेल? दोन तासांनी निकाल येणार

पुणे हिट अँड रन प्रकरणाबाबत साडे चार वाजता बाल न्याय मंडळाचा निकाल येणार आहे, अशी माहिती आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांनी दिली. प्रशांत पाटील आता शिवाजीनगर कोर्टाकडे रवाना झाले आहेत. विशाल अग्रवालची बाजू प्रशांत पाटील मांडणार आहेत.

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना मोठा झटका; सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा झटका बसला आहे.

सुप्रीम कोर्टाने सोरेन यांचा अंतरिम जामीन नाकारला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन द्यावा, अशी मागणी सोरेन यांनी केली होती.

ईडीने केलेल्या अटकेला देखील कोर्टात आव्हान दिलं होतं, मात्र कोर्टाने ती देखील याचिका फेटाळली.

पुणे हिट अँड रन : विशाल अग्रवालची पुन्हा पोलिसांकडून चौकशी सुरु

पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवालची पुन्हा पोलिसांकडून चौकशी सुरू केली आहे. पोलीस हे विशाल अग्रवालला घेऊन पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. पोलीस आयुक्तालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार आहे. पुणे पोलीस विशाल अग्रवालची चौकशी करणार आहेत. चौकशी करून कोर्टात घेऊन जाणार आहेत.

ST Bus Fire : वणी बस स्थानकात उभी असलेली एसटी बस पेटली

नाशिकमधील वणी बस स्थानकात एसटी महामंडळाची बस पेटली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीचा स्विच बंद केला. त्यानंतर प्रवाशांना खाली उतरवल्याने २७ प्रवासी सुरक्षित आहेत. वणी बस स्थानकात नाशिकहून कळवणला जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतला.

lok Sabha Election : भाजप नेते पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी, लोकसभा निवडणुकांच्या काळातच थेट कारवाई

भाजप नेते आणि भोजपुरी गायक पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. NDA च्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. पवन सिंह यांच्या निर्णयामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

Pune Hit And run case : पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला कोर्टात केलं हजर

पुण्यातील कल्याणीनगरमधील कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले आहे. थोड्याच वेळात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे.

Pune News  : पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मुलाला कोर्टात केलं हजर

कल्याणीनगर अपघात प्रकरणी आरोपी मुलाला बालहक्क न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलांनी पबमध्ये दारू पिऊन कार चालविल्या प्रकरणी पोलिसांनी मोटर वाहन कलम 185 नुसार गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी आता मुलाल पुणे पोलिसांनी बालहक्क न्यायालयात हजर केलं.

Pune News : पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महानगर पालिका अलर्ट मोडवर, २ अवैध पबवर कारवाई

कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका देखील अलर्ट मोडवर आली आहे.

पालिकेने आता 2 अवैध पबवर कारवाई केली आहे. पुण्यातील कोरेगाव परिसरातील २ पबवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वॉटर्स आणि ओरिला या दोन्ही पबवर पुणे महानगरपालिकेने कारवाई केली.

पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता

पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यामुळे 10 जूनला सुरू होणारे अधिवेशनात पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपी मुलगा कोर्टात हजर न राहिल्यास कारवाईची शक्यता

बाल हक्क न्यायालयाने हिट ॲंड रन प्रकरणातील मुलाला सज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिल्यास पुणे पोलिस तातडीने त्याला अटक करणार

पुणे पोलिसांकडून मुलाला बाल हक्क न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी वकिलांकरवी नोटीस

न्यायालयात हजर न राहिल्यास फरार घोषित करण्याची कारवाई करणार असल्याचा ही नोटिशीत उल्लेख आहे.

Rain Update : बुलढाण्यात सकाळी अवकाळी पावसाने लावली हजेरी

हवामान अंदाजानुसार विदर्भात पावसाचा येलो अलर्ट

आज सकाळी बुलडाण्यात विजेच्या कडकडाट सह अवकाळी पावसाने दमदार हजेरी

त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला

आज दिवसभर उन्हाचा तडाखा बसणार असल्याचाही अंदाज व्यक्त

उकड्याने जनता हैराण

 Vegetable Price Hike : वातावरणातील बदलामुळे भाजी पाल्याची आवक घटली, दरात वाढ

नांदेड जिल्ह्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे.

वातावरणातील बदलाचा फटका शेती पिकांसह भाजी पाला शेतीला बसतोय.

बाजारात भाजी पाल्याची आवक घटली.

आवक घातल्याने भाजी पाल्याच्या दरात वाढ

लसूण 200 रुपयांवर तर इतर पालेभाज्या 50 ते 60 रुपय प्रति किलो दराने विक्री

Mumbai Traffic : ठाण्यातून मुंबईला जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुलुंड टोल नाक्यामुळे वाहतूक कोंडी ठाणे ते मुंबईला जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ठाणे वाहतूक विभागाकडून टोल नाक्यावर गाडया सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे 1 ते 2 किलो मीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. टोल नाक्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी उशीर होण्याची शक्यता आहे.

Pune News : पुणे हिट अँड रन प्रकरण : बिल्डरचे वडील सुरेंद्र अग्रवालचे छोटा राजनशी संबंध?

पुणे हिट अँड रन प्रकरण बिल्डर विशालच्या मुलाची हमी देण्यासाठी आलेल्या त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवालांचे संबंध हे थेट छोटा राजनशी असल्याचं समोर आलं आहे. त्यांचं सन 2007-08 च्या दरम्यानचं एक प्रकरण समोर आलं आहे. मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित प्रकरणं सीबीआयकडे हस्तक्षेप करण्यात आलं होतं.

बिल्डरचे वडील सुरेंद्र अग्रवालचे छोटा राजनशी संबंध?
Pune News Saam tv

Ratnagiri News : रत्नागिरीत रात्री अवाकाळी पाऊस

रत्नागिरीला पुन्हा एकदा रात्री अवकाळी पाऊस

दक्षिण रत्नागिरीत रात्री पावसाच्या कोसळधारा

मेघगर्जेनेसह पाऊस, अनेक ठिकाणाची बत्ती गुल

Kolhapur News : आमदार पी. एन पाटील यांची प्रकृती चिंताजनक, नागरिकांनी केली पूजा होम हवन

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील तीन दिवसांपूर्वी बाथरूममध्ये पाय घसरून पडले होते. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर दुखापतही झाली होती. पी. एन. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या ते अतिदक्षता विभागात आहेत.

पी. एन. पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर करवीर मतदार संघातील नागरिकांनी पी. एन. पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी अनेक गावांमध्ये होम हवन, पूजा पाठ करत आहेत. तर पी एन पाटील यांच्या एका चाहत्यांने थेट उज्जैन इथे जाऊन मंदिरात पूजा केली आहे.

Ghatkopar Hoarding collapse: घाटकोपर होर्डिग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १८ वर; SIT तपास सुरू

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १८ वर पोहचला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. राजू सोनावणे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान, दुर्घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. याप्रकरणी इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेला सदोष मनुष्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत भिंडेच्या कर्मचाऱ्यांसह सात जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

Pune News : पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ड कनेक्शन? धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात सुसाट कार चालवत दोघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या बिल्डर पुत्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. तपासानंतर अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत.

विशाल अग्रवाल याचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले आहे. विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध असल्याचे माहिती आहे. यापूर्वी देखील त्याने खूनाच्या प्रकरणामध्ये पोलिसांवर दबाव आणल्याचे समोर आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com