मुलासाठी बिबट्याला भिडला बाप, मृत्यूच्या जबड्यातून मुलाची सुटका

Shocking Leopard Attack: मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढलेला असतानाच आता आणखी एक थरकाप उडवणारी घटना समोर आलीये. मृत्यूच्या जबड्यातून आपल्या मुलाला वाचवणाऱ्या जिगरबाजा बापाची कहाणी नेमकी काय आहे?
A courageous father risks his life and fights off a leopard to save his young son during a shocking attack in Junnar.
A courageous father risks his life and fights off a leopard to save his young son during a shocking attack in Junnar.saam tv
Published On

ही कहाणी आहे एका जिगरबाज बापाची. ज्याचं नाव ऐकताच भल्याभल्यांची गाळण उडते, त्या क्रूर बिबट्याला एका बापाने सळो की पळो करून सोडलंय. जुन्नरमध्ये बिबट्याचं थैमान सुरू असतानाच, शिरोली बुद्रुकमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली. पाचवीत शिकणारा मुलगा आपल्या वडीलांसोबत दुचाकीवरून जात असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. समोर साक्षात मृत्यू उभा असतानाही, मुलाच्या रक्षणासाठी हा बाप ढाल बनून रिकाम्या हातानेच बिबट्याशी लढला.

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेने जुन्नरमध्ये संतापाचा स्फोट झालाय. वनविभागाने परिसरात ४ पिंजरे लावले खरे, पण बिबट्यांची दहशत कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आज वडिलांच्या प्रसंगावधानामुळे एका चिमुरड्याचे प्राण वाचले असले, तरी याआधी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे.

प्रशासनाचा ढिम्म कारभार आणि मानवी रक्ताची चटक लागलेल्या बिबट्यांची सध्या प्रचंड दहशत आहे. मुलासाठी काळ बनून आलेल्या बिबट्याला भिडणाऱ्या या 'सुपरहिरो' बाप नावाच्या वाघाची सध्या पंचक्रोशीत चर्चा रंगलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com