Maratha Reservation Survey: मराठा सर्वेक्षणावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून बहिष्कार

Maratha News: सर्वेक्षणासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा समोर असल्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.
Maratha Reservation Survey
Maratha Reservation SurveySaam TV
Published On

Survey Of Marathas:

मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने बहिष्कार टाकला आहे. सर्वेक्षणासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा समोर असल्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.

Maratha Reservation Survey
Maratha Survey In Patan : पाटण तालुक्यात 38 हजार 736 कुणबी नोंदी आढळल्या, मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी आजपासून कार्यवाही

दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करत सराव परीक्षा घेण्याच्या कामात शिक्षक व्यस्त आहेत. शैक्षणिक कार्य गरजेचे असताना सर्वेक्षणाच्या कामात गुंतवणे योग्य नसल्याचं शिक्षक संघाचं म्हणणं आहे. यासंबंधीचे पत्र विधान परिषदेचे शिक्षक आमदार सुधाकर अडबालेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पाठवलं आहे.

बारावीची सराव परीक्षा स्थगित

राज्यातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने २३ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्य सरकारतर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषद शाळेसह इतर खाजगी माध्यमिक शाळेवरील आणि महाविद्यालयाच्या शिक्षकांवर सोपवण्यात आली असल्याने जिल्ह्यातील ५ हजार तर शहरातील १ हजार ७०० शिक्षक या सर्वेक्षणाच्या कामावर रुजू झाले अलेत. त्यामुळे २३ जानेवारीपासून शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची सराव परीक्षा स्थगित करण्यात आली असल्याचं विभागीय मंडळाकडून सांगण्यात आलंय.

मराठा समाजाचे सर्वेक्षण करताना हिंगोलीत पहिल्याच दिवशी अनेक अडथळे

राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यातील मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू केले आहे. जिल्हास्तरावर महसूल प्रशासनाने युद्ध पातळीवर हे सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. मात्र पहिल्याच दिवशी हिंगोली जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणाची प्रक्रिया करताना अडथळे निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला. हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील लाख गावात सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर ओटीपी येत नसल्याने मराठा समाजातील कुटुंबाचं सर्वेक्षण थांबलं होतं.

मराठा समाजातील कुटुंबाचं सर्वेक्षण करणारे शासनाचे प्रगणक योग्य प्रश्न विचारत नसल्याच्या तक्रारी देखील जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.

Maratha Reservation Survey
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी बीडमधील काका-पुतण्यांनी जुंपली बैलगाडी; सर्जा-राजासोबत धरली मुंबईची वाट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com