मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) पार्श्वभूमीवर मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी मराठा बांधवासह मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण (Maratha Survey) करण्याचा आदेश दिला. आजपासून (ता. 23 जानेवारी) संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू होत आहे. (Maharashtra News)
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात या सर्वेक्षणाची तयारी करण्यात आली आहे. पाटण तालुक्यात 453 प्रगणक व 32 पर्यवेक्षक यांची या कामाकरीता नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे.
पाटण तालुक्यात मागील महिन्यात कुणबी (kunbi) नोंदीची शोधमोहीम युद्ध पातळीवर राबविण्यात आली. त्यानुसार पाटणमधील सुमारे 200 गावांमध्ये एकूण 38736 कुणबी संदर्भात नोंदी आढळून आल्या आहेत. या सर्व मराठी भाषेतील नोंदी असून मोडी भाषेतील नोंदी वाचनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. कुणबी नोंदी संदर्भातील आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
800 कुणबी दाखल्यांचे वितरण
या नोंदीच्या पार्श्वभूमीवर पाटण महसूल विभागाने यापूर्वीच कुणबी दाखल्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत (ता. 21 जानेवारीपर्यंत) सुमारे 800 कुणबी दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नोंदी ह्या पाटण तालुक्यात असून दाखले वितरणाचे प्रमाण देखील पाटण तालुक्यात सर्वाधिक असल्याने पाटण मधील सकल मराठा समाजाने समाधान व्यक्त केले आहे.
सुट्टीच्या दिवशीही कामकाज
मनुष्यबळाची कमतरता असली तरी सुट्टीच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेनंतर रात्री उशिरा पर्यंत कार्यालयात थांबून ही मोहीम अधिक वेगवान करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कुणबी नोंदीच्या दाखल्याची वितरणाची मोहीम अधिक सुटसुटीत व वेगवान करण्यासाठी प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी रविवार सुट्टीचा दिवस असताना देखील सेतू कार्यालयात व तहसील कार्यालयात भेट देऊन प्रलंबित दाखल्याचे वितरण तत्परतेने होण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या. जागेवरच सुमारे 23 कुणबी दाखले ऑनलाईन पद्धतीने निर्गमित केले.
सर्वेक्षणासाठी येणा-या प्रगणकांना सहकार्य करा
शासनाच्या निर्देशानुसार आजपासून (ता. 23 जानेवारी) पाटण तालुक्यात जे प्रगणक मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी येणार आहेत. त्यांना सर्व मराठा बांधवांनी माहिती देऊन सहकार्य करावे असेही आवाहन गाढे यांनी केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.