महाडनगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाने मोठा राडा केला होता. यामुळे त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र तो अद्यापही पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. यावरून काहीकाळ राजकारण देखील तापले होते. यावरूनच आता मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच फटकारलं आहे. मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना या घटनेप्रकरणी काहीही करता येत नाही असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.
मुख्यमंत्री आणि भरत गोगावलेंकडून निर्देश घ्या, अशा सूचना कोर्टाने राज्य सरकारला दिल्या आहेत. भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले, पुतण्या महेश गोगावले यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.
या घटनेप्रकरणी मंत्र्याच्या मुलासह इतर आरोपींना पकडण्यात अपयश आले आहे. सरकार कोणालाही 24 तासात अटक करू शकते, पण जेव्हा त्यांना करायची नसते तेव्हा ते अशी प्रतिज्ञापत्र सादर करतात अशा कडक शब्दात हायकोर्टाने सरकारला दणका दिला आहे. राज्यातील कायद्याचे राज्य प्रतिकूलरीत्या प्रभावित झाले आहे. माननीय मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना त्याबाबत काहीही करता येत नाही अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.
विकास गोगावले यांच्या अटक पुर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहे. जामिन मिळाला नाही तर हजर करणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. गुन्हे करून मंत्र्यांची मुलं मोकाट फिरतात असे ताशेरे न्यायालयाने पोलिसांवर ओढले आहेत. 2 डिसेंबर रोजी महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या वादात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोर्टाचा आणि पोलिसांचा अवमान करायचा नाही, प्रत्येक जण अटक पूर्व जामिनासाठी जातो, तो गुन्हा आहे का असा सवाल गोगावले यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.