High Court Judge rohit deo Resign : 'स्वाभिमानाच्या विरोधात काम करु शकत नाही', मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा कोर्टरुममध्ये राजीनामा

Nagpur News : निवृत्तीला 1 वर्ष शिल्लक असताना त्यांनी अचानक राजीनामा का दिला याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
Rohit Deo
Rohit Deo Saam TV
Published On: 

Mumbai News : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार कोर्टाचे कामकाज नियमित वेळेपूर्वी आटोपत न्यायालयात न्यायमूर्ती रोहित देव यांनी राजीनाम्याची घोषणा केली. देव यांच्या राजीनामा देण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र निवृत्तीला 1 वर्ष शिल्लक असताना त्यांनी अचानक राजीनामा का दिला याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

देव यांनी आपल्या राजीनामा देण्याच्या निर्णयामागील कारण सांगितले नाही. परंतु ते म्हणाले की स्वत:च्या स्वाभिमानाच्या विरोधात वागू शकत नाही. न्यायमूर्ती देव यांनी 2022 मध्ये कथित माओवादी संबंध प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांची निर्दोष मुक्तता केली होती. (Live Marathi News)

Rohit Deo
Rahul Gandhi Gets Relief : राहुल गांधी पुन्हा संसदेत दिसणार, २०२४ ची निवडणूकही लढणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ काय?

सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती देत ​​उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला या प्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती देव यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारच्या ३ जानेवारीच्या ठरावाच्या (जीआर) अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. ज्यात समृद्धी महामार्गाच्या बांधकाम संबंधित कंत्राटदारांकडून गौण खनिजांच्या अवैध उत्खननाबद्दल महसूल विभागाने राज्याला दंड ठोठावला होता. (Latest News Update)

Rohit Deo
Devendra Fadanvis News: आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार झालाच नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; घटनाक्रमही सांगितला

रोहित देव यांची 5 जून 2017 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती देव यांची नंतर 12 एप्रिल 2019 रोजी कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांची सेवानिवृत्ती तारीख 4 डिसेंबर 2025 होती. मात्र त्याआधीच त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.