नगरसेवकपद देतानाच ६ जणांकडून घेतले राजीनामे; नाशिक महापालिकेत भाजपचा अजब फॉर्म्युला

Nashik Municipal Corporation: नाशिक महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपच्या सहा आणि शिंदे गटाच्या दोन जणांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येकाला एक वर्षापर्यंत नगरसेवक पदावर राहता येणार आहे.
BJP's one-year nominated councillor formula in Nashik Municipal Corporation
BJP's one-year nominated councillor formula in Nashik Municipal Corporationsaamtv
Published On: 
Summary
  • नाशिक महापालिकेत भाजपचा एक वर्षाचा स्वीकृत नगरसेवक फॉर्म्युला

  • स्वीकृत नगरसेवकपद देतानाच भाजपने सहा जणांचे राजीनामे घेतले

  • नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवकांकडून आधीच राजीनामे लिहून घेतल्याची चर्चा

नाशिक महानगरपालिकेतील १० स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्तीची प्रक्रिया बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी पार पडली. भारतीय जनता पक्षाकडून ६ तर शिंदे गटाकडून २ जणांना स्वीकृत नगरसेवक पद हे देण्यात आले आहे. तर प्रत्येकी १ वर्ष हा या स्वीकृत नगरसेवकांना कालावधी देण्यात आला. नाशिक महापालिकेतील फॉर्म्युला चर्चेचा विषय ठरला. एक वर्षभरातपूरते नगरसेवक पद देताना त्या सदस्यांकडून पक्षांनी आधी त्यांच्याकडून पदाचे राजीनामे लिहून घेतलेत. या अजब गजब फॉर्मुल्याची चांगलीच चर्चा ही शहरभर रंगलीय.

माजी नगरसेवक रामहरी संभेराव, संदीप लेणकर, चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण रोहिणी नायडू आणि दि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे माजी अध्यक्ष हेमंत धात्रक यांना भाजपकडून प्रत्येकी एक वर्षासाठी संधी मिळालीय. स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून ६०० हून अधिक उमेदवार इच्छुक होते. मात्र भाजपने आगामी कुंभमेळा लक्षात घेता अनुभवी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेत ६ नावांची यादी आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे दिली होती.

BJP's one-year nominated councillor formula in Nashik Municipal Corporation
भाजप-शिवसेना आमनेसामने; शिंदेसेनेच्या 4 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, राजकीय वर्तुळात खळबळ

महापौर हिमगौरी आहेर-आडके, गटनेते श्याम बडोदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत अजित चव्हाण, चंद्रशेखर पंचाक्षरी, रोहिणी नायडू, हेमंत धात्रक, रामहरी संभेराव आणि संदीप लेणकर यांचे नामनिर्देशन पत्र आयुक्तांकडे जमा करण्यात आले होते. त्यानंतर महायुतीमध्ये भाजपकडून ६ जणांना आणि शिंदे गटाला २ स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले. प्रत्येकी १-१ वर्ष नगरसेवक पद हे देण्यात आले.

BJP's one-year nominated councillor formula in Nashik Municipal Corporation
दिवाळीनंतर राजकारणात मोठा भूकंप होणार? राष्ट्रवादीचे सर्व आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, पडद्यामागे काय घडतंय?

स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून नव्या वादाला तोंड फुटले

भाजपने ठाकरे गट फोडण्यासाठी मोठा डाव टाकला. रात्री उशिरा १० ऐवजी ११ अर्ज स्वीकारल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे येत्या १६ नोव्हेंबरला होणाऱ्या महापालिकेत स्वीकृत सदस्यांसाठी निवडणूक अटळ आहे. . काँग्रेस आणि शिवसेनेची एकत्रित गटनोंदणी झाली आहे. आता काँग्रेसच्या नगरसेवकांकडून भाजपचे सुनील आडके यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून शिफारस करण्यात आलीय. काँग्रेसच्या नगरसेवकांकडून भाजपची शिफारस झाल्याने काँग्रेसलाही मोठा धक्का बसलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.