Political News: 'देशात तणाव पसरावा आणि दंगली घडाव्यात, अशी मोदींची इच्छा', ठाकरे गटाच्या खासदारांचा गंभीर आरोप

BJP of creating communal tension and dividing India: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवतांवर गंभीर आरोप केले आहेत. काही लोक महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे.
sanjay raut slam on bjp
sanjay raut slam on bjpsaam tv
Published On

"देशात तणाव पसरावं आणि दंगली घडाव्यात, अशी मोदींची इच्छा आहे. भाजपात नवहिंदुत्व सुरू झालंय. महाराष्ट्रातील मंत्री इफ्तार पार्ट्यांना विरोध करत आहेत. मुस्लिमांना वेगळी दुकानं आणि इतरांना वेगळी दुकानं असं कसं चालेल. हिंदूस्थानात हिंदू आणि मुस्लीम अशी दोन राज्य बघायला मिळत आहेत. देश विभाजनाकडे जात आहे. काही लोक महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत", असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारचं लक्ष नाही

"राज्यात २ वर्षात ३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याबद्दल सरकार बोलत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारचं लक्ष नाही. पाकिस्तानच्या निमिर्तीवेळीही काहींनी अशीच परिस्थिती निर्माण केली होती. देशात तणाव पसरवणं हे भाजपचं काम आहे", असा घणाघात राऊत यांनी केला आहे.

sanjay raut slam on bjp
Mumbai MHADA: मुंबईत १२ लाखांत पूर्ण होणार घराचं स्वप्न; ४,७०० घरांसाठी लॉटरी, सोमवारपासून अर्ज करता येणार

काही लोक महाराष्ट्र पेटवायला निघालेत

"राज्यातील हालत तुम्हीच बघा. हिंदूस्थानात हिंदू आणि मुस्लीम अशी २ राज्य बघायला मिळत आहे. देश विभाजनाकडे जात आहे. नेहरू म्हणाले होते, भारताचा पाकिस्तान होऊ देणार नाही. काही लोक महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. मोहन भागवत कधीच महागाई आणि बेरोजगारीवर बोलत नाहीत. आम्ही लोकांच्या पोटावर बोलतो, तुम्ही हिंदूत्वावर बोलता", असंही राऊत म्हणाले.

sanjay raut slam on bjp
Badlapur: बदलापुरातील प्रदुषणकारी कंपन्यांना राज्य सरकारचा दणका, २४ MIDC कंपन्यांवर कारवाई

हलाल आणि झटक्यामुळे हिंदुत्वाला झटका

"सध्या हलाल आणि झटका हा मुद्दा तापलाय. हलाल आणि झटक्यामुळे हिंदुत्वाला झटका बसलाय. दंगली घडवणे, मशिदीवर हल्ला करणे, हिंदू तरूणांची डोकी भडकवणं हेच यांचे काम आहे. खरंतर हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र काम करायला हवे, असे मोहन भागवत नेहमी म्हणतात. पण हे अंमलात आणणार कोण? भारतीय जनता पार्टी ही त्यांचीच पार्टी आहे ना?" असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com