Ravindra Chavan: कोकणात भाजपाला घवघवीत यश, रवींद्र चव्हाण यांना भाजपाकडून मोठी जबाबदारी

BJP On Ravindra Chavan: भारतीय जनता पार्टीने मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधीच 2029 च्या निवडणुकीची तयारी केल्याचं या निर्णयावरुन म्हटलं जात आहे.
Ravindra Chavan
Ravindra Chavangoogle
Published On

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचा गाडा हाकणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. नागपूरमध्ये दुपारी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने एक मोठी खेळी केली आहे.

रविंद्र चव्हाणांकडे भाजप नवी जबाबदारी देणार आहे. रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. २०२९मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे जबाबदारी देणार असल्याचे समोर आले आहे. एकट्या भाजपचे २००हून अधिक आमदार निवडून आणण्याचे असे उद्दीष्ट आहे.

Ravindra Chavan
Sanjay Raut: 'चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे', संजय राऊतांची मागणी

रविंद्र चव्हाण यांचा जन्म २० सप्टेंबर १९७० साली कल्याण येथे झाला. ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४, २०१९ आणि आता २०२४ असे सलग चार टर्म निवडून आले आहेत. रविंद्र चव्हाण यांनी यापूर्वी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्यांचे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.

Ravindra Chavan
Ladki Bahin Yojana: दिल्लीतही राबवली लाडकी बहीण योजना, महिलांना २१०० नाही तर एवढे रुपये मिळणार

२०२२ साली स्थापन झालेल्या, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री राहिले. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ही खाती देण्यात आली होती. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत जोरदार कामगिरी त्यांनी निभावली. विधानसभा निवडणुकीत बहुजन आघाडीचा किल्ला उदध्वस्त केला. मात्र आता प्रत्यक्ष मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी न देता पक्ष संघटना अधिक मजबूतपणे बांधण्याची जबाबदारी रविंद्र चव्हाणांच्या खांद्यावर सोपवण्यात येणार आहे.

Ravindra Chavan
Sanjay Raut: २०२९ पर्यंत मोदी पंतप्रधान राहतील का? एक देश एक निवडणुकीवरून राऊतांचा टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com