

हर्षवर्धन सपकाळांच्या विधानामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले
टिपू सुलतानाच्या मुद्द्यावर भाजपने राज्यव्यापी आंदोलन केले
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष
मालेगाव महापालिकेत उपमहापौरांनी टिपू सुलतानाचा फोटो आपल्या दालनात लावल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिलेली ही प्रतिक्रिया वादात सापडली आहे. सपकाळांच्या याचं विधानावरून राज्यात भाजपनं आंदोलन पुकारलं. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातही राजकीय आखाड्यात चांगलीच कुस्ती रंगली.
काँग्रेस भवनासमोर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. त्यात हे आंदोलन फक्त घोषणाबाजीवरच थांबलं नाही, तर त्याचं रूपांतर दगडफेकीत झालं. यात काँग्रेसचा कार्यकर्ता रक्तबंबाळ झालाय तर काही वाहनांच्या काचाही फुटल्यात.
दरम्यान पोलिसांनी भाजपला अभय दिल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलनही केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही सपकाळांनी माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका घेतली. मात्र भाजपची 'ध'चा 'मा' करण्याची जुनी खोड आहे, असं म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.
पुण्यातील या राड्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलयं. सपकाळांच्या या वक्तव्यावरुन येत्या काळातही राजकारण सुरु राहिल. आंदोलनात झालेल्या दगडफेकीमुळे मात्र महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला काळीमा फासला गेलाय, हे निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.