विधानपरिषदेतील पराभवानंतर महायुतीत 'महाभारत', बन विरुद्ध धंगेकर वाद पेटला; महायुतीच्या चिंतन बैठकीआधीच राडा

Navnath Ban vs Ravindra Dhangekar: विधानपरिषदेतील 3 जागांच्या पराभवानंतर भाजप-शिंदेसेनेतील वाद आता आणखी विकोपाला गेला....महायुतीनं पराभवानंतर चिंतन बैठकीचंही आयोजन केलयं....मात्र अशातच बन विरूद्ध धंगेकर वाद कसा पेटलाय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
BJP-SHINDE SENA CLASH
BJP-SHINDE SENA CLASHsaam tv
Published On: 

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या तीन जागांवरील पराभवानंतर सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वाद चांगलाच पेटलाय...या पराभवामागची कारणं शोधण्यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक चिंतन बैठकही लवकरच मुंबईत होणार आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच भाजप आणि शिंदेसेनेचे नेते एकमेकांवर तुटून पडलेत.विशेषतः पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवावरून भाजप प्रवक्ते नवनाथ बन आणि शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यातील वैयक्तिक वादाने आता खालची पातळी गाठलीय..

केवळ एकमेकांवर टीका करून धंगेकर आणि बन थांबलेले नाहीत तर दोघांनी सोशल मिडीयावरही एकमेंकांवर सडकून टीका केली....धंगेकरांनी बन पाव खाणाऱ्या कुत्र्याचा फोटो पोस्ट करत नवनाथ बन यांना चांगला डिवचलं...ही पोस्ट पाहा....

तर दुसरीकडे नवनाथ बन यांनी धंगेकरांना पक्ष बदलावरून थेट सरड्याची उपमा दिली....

दरम्यान विधानपरिषदेतील पराभवाच्या आरोपांवरून भाजप आणि शिंदेसेनेतील वाढत्या वादाची दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेतलीय. मित्रपक्षांतील अंतर्गत वादामुळे महायुतीची प्रतिमा मलिन होतेय.राज्यातील प्रमुख नेत्यांनी तत्काळ एकत्र बसून गैरसमज दूर करावा, दिल्लीतील वरिष्ठांचे निर्देश वाद वाढू न देता एकमेकांशी समन्वय साधावा आणि तात्काळ वादावर पडदा टाकावा, असे खडेबोल दिल्लीतील भाजप हायकमांडने सुनावलेत...आता दिल्लीतील हायकमांडनं राज्यातील प्रमुख नेत्यांना वादावर पडदा टाकण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील चिंतन बैठकीनंतर तरी भाजप-शिंदेसेनेतील वाद शमणार की अंतर्गत वादाचा भडका उडतच राहणार.? हे पाहणं महत्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.