Maharashtra Politics: तिकीटावरुन सख्ख्या भावांमधील संघर्ष टळला! भाजपच्या विद्यमान आमदाराची निवडणुकीतून माघार

Maharashtra Assembly Election 2024: नाशिकच्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून आहेर बंधुंमधील संघर्ष टळला आहे. भाजप आमदार डॉ.राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे.
Maharashtra Politics: तिकीटावरुन सख्ख्या भावांमधील संघर्ष टळला! भाजपच्या विद्यमान आमदाराची निवडणुकीतून माघार
Maharashtra PoliticsSAAM Digital
Published On

अजय सोनवणे, नाशिक

Chandwad Deola Assembly Elections: राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या तिकिटावरुन इच्छुकांमध्ये जोरदार खडाजंगी दावे- प्रतिदावे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी चांगलीच वाढत आहे. अशातच आता नाशिकच्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून आहेर बंधुंमधील संघर्ष टळला आहे. भाजप आमदार डॉ.राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे.

Maharashtra Politics: तिकीटावरुन सख्ख्या भावांमधील संघर्ष टळला! भाजपच्या विद्यमान आमदाराची निवडणुकीतून माघार
Sanjay Raut: 'भाजप, आरएसएसचा अजेंडा, म्हणून न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काळी पट्टी हटवली..', संजय राऊत कडाडले

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच चांदवड देवळा मतदासंघांचे विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल आहेर यांना त्यांचे सख्खे बंधू केदा आहेर यांनी आव्हान दिले होते. मागील दोन विधानसभा निवडणुकीत राहुल आहेर यांच्यासाठी थांबलो, मात्र यावेळी निवडणूक लढवणारच, अशी भूमिका घेत केदा आहेर यांनी विधानसभेला भावाविरुद्ध दंड थोपटले होते. त्यामुळे उमेदवारीवरुन जोरदार संघर्ष पाहायला मिळणार? असे दिसत होते.

मात्र या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट आला आहे. चांदवड - देवळा मतदार संघाचे विद्यमान भाजप आ.डॉ.राहुल आहेर यांची विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे. तसेच मोठे बंधू नाफेड संचालक केदानाना आहेर यांच्या नावाची उमेदवारीसाठी शिफारस केली आहे. त्यामुळे केदा आहेर यांना भाजपचे तिकिट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुटुंबात वाद होवू नये, कुटुंब एकसंघ राहावे यासाठी निर्णय घेतल्याचे आ.आहेर यांनी सांगितले.

Maharashtra Politics: तिकीटावरुन सख्ख्या भावांमधील संघर्ष टळला! भाजपच्या विद्यमान आमदाराची निवडणुकीतून माघार
Maharashtra Politics : महायुतीची डोकेदुखी वाढली, महादेव जानकरांनी शड्डू ठोकला, १०० जणांची पहिली यादी येणार, बारामतीमध्येही उमेदवार उतरवणार?

दरम्यान, लोकसभा सारखा फटका बसवून घेऊ नका, विधानसभेला काम करा, अशा सूचना भाजपच्या केंद्रीय समितीकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या देशव्यापी पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून महाराष्ट्रतील २८८ मतदारसंघात भाजपची यंत्रणा जोरदार काम करणार आहे. देशभरात असलेल्या भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेसाठी नेमले जाणार आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २०० कार्यकर्ते काम करणार आहेत.

Maharashtra Politics: तिकीटावरुन सख्ख्या भावांमधील संघर्ष टळला! भाजपच्या विद्यमान आमदाराची निवडणुकीतून माघार
Accident News: मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅव्हल्सची जोरदार धडक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com