
मुंबई : लक्षवेधी प्रश्न मांडण्यासाठी खंडणी मागितल्याचा ऑडिओ बॉम्ब भाजप आमदाराने विधीमंडळात फोडलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. खंडणी मागणारा आमदार कोण? आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
भाजप आमदार परिणय फुकेंनी विधान परिषदेत एजंट बॉम्ब फोडलाय. विधीमंडळ अधिवेशनात प्रश्न विचारण्यासाठी, लक्षवेधी न लावण्यासाठी एजेंट्सकडून गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल मालकांना धमक्या देत खंडणी मागितल्याचा आरोप फुकेंनी विधानपरिषदेत केलाय. तर सरकारने खंडणीखोर एजेंटवर कारवाईचं आश्वासन दिलंय. मात्र या प्रकरणी परिणय फुकेंनी विधानपरिषदेत केलेले आरोप काय आहेत? पाहूयात.
परिणय फुकेंचा 'एजंट बॉम्ब'
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांची मागणी
लक्षवेधी लावून कारवाई करु, राईस मिलर्सना धमकी
राईस मिल बंद करून जेलमध्ये टाकण्याच्याही धमक्या
विरोधी पक्षातील आमदाराच्या राईट आणि लेफ्ट हँडचा सहभाग
एजंटसोबतच्या संवादाची ऑडिओ क्लिपही विधीमंडळात सादर
या गंभीर प्रकरणात आता मुख्यमंत्री फडणवीसांची एण्ट्री झालीय. परिणय फुकेंनी या ऑडिओ क्लिप मुख्यमंत्री फडणवीसांच्या हाती सोपवल्यात, तर नाना पटोलेंनी मात्र परिणय फुकेंचा समाचार घेण्याचा इशारा दिलाय. मंत्रालयातील फिक्सर आणि दलालांच्या विरोधातील कारवाईबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी याआधीच थेट संकेत दिले होते.
मंत्रालयातील दलाली आणि फिक्सिंग हे राज्याला काही नवीन नाही. या टोळ्या हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र आता राज्याच्या सर्वोच्च सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी थेट पैसे मागितले जात असतील तर अशा खंडणीखोर एजेंटना आणि त्यांच्या आकांनाही कायद्याचा झटका द्यायला हवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.