
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बजेटवरील रुपयाचं ₹ हे चिन्ह हटवून त्या ठिकाणी तामिळ भाषेतील ரூ हे चिन्ह ठेवण्याचा निर्णय स्टॅलिन सरकारनं घेतला आहे. एकीकडे संसदेत राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून हिंदी लादण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्टॅलिन सरकारने घेतलेल्या या निर्णयावरून वाद होण्याची शक्यता आहे.
आपल्या देशात हिंदी भाषेतील रुपयाचं ₹ हे चिन्ह प्रतीक मानलं जातं. त्यालाच आता तामिळनाडू सरकारने तामिळ भाषेतील ரூ हे चिन्ह पर्याय म्हणून निवडलं आहे. असा निर्णय घेणारं तामिळनाडू हे देशातील पहिलंच राज्य ठरलं आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून तामिळनाडूवर हिंदी भाषेची जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केला आहे.
₹ हे चिन्ह उदय कुमार धर्मलिंगम यांनी बनवलं होतं. हे चिन्ह भारताच्या तिरंग्यावर आधारित असून २०१० साली ते अमलात आणलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे याच उदय कुमार धर्मलिंगम यांचे वडील हे स्टॅलिन यांच्या पक्षाचे आमदार होते.
या लोगोचा अर्थ काय?
तामिळ भाषेमध्ये रुपयाला रुबाई (Rubaai) असं म्हटलं जातं. त्याच्या सुरुवातीच्या रु या शब्दाला प्रमाण मानून ரூ हे स्थानिक भाषेमध्ये रुपयाचे प्रतीक मानलं गेलं आहे. या चिन्हाखाली 'आपल्यासाठी सर्वकाही'(everything for all) असं कॅप्शनही देण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.