- अमर घटारे
Nitesh Rane : राज्यात (maharashtra) हिंदुत्ववादी सरकार आहे. तुम्हाला तुमचे सण साजरे करायचे असेल तर शांततेत साजरे करा. हिंदूंना कुठल्याही पद्धतीचे आव्हान देण्याचा प्रयत्न करु नका असा इशारा भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी समाजकंटकांना अमरावती येथे दिला आहे. (Breaking Marathi News)
अमरावती येथील परतावड्यात आणि धुळ्यात ईदच्या मिरवणुकीत आक्षेपार्ह घाेषणा दिल्याने एकच खळबळ उडाली. परतावड्यातील घटनेचे पाेलीसांनी कसून चाैकशी केली. त्यानंतर काही लाेकांना पाेलीसांनी अटक केली. धुळे येथे असाच प्रकार घडल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या घटनेबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बाेलताना अशी नाटकं आमच्या महाराष्ट्रात आता चालणार नाही. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार नाही. नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री नाही, अस्लम शेखही मंत्री नाही आणि त्यातही प्रामुख्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत अशी टिप्पणी राणेंनी केली. (Nitesh Rane Latest Marathi News)
त्यामुळे जे सगळे असे नाटके करत असतील त्यांना पोलीस शोधून काढतील. पुन्हा त्यांच्या तोंडातून अशा घोषणा निघणार नाही व परत त्यांची जीभ अशी वळवळवणार नाही याची काळजी आमचे सरकार घेईल असेही राणेंनी नमूद केले. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.