Wadsa Forest : १३ लाेकांचा बळी घेणा-या नरभक्षक सिटी - १ वाघास पकडलं; नागरिकांची उसळली गर्दी

गेल्या महिन्यापासून या वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या टीम जंगलात ठाण मांडून बसल्या होत्या.
gadchiroli, bhandara, chandrapur, nagpur, tiger, wadsa forest department, citizens, city 1 tiger
gadchiroli, bhandara, chandrapur, nagpur, tiger, wadsa forest department, citizens, city 1 tigersaam tv

- अभिजीत घाेरमारे / मंगेश भांडेकर

Tiger : गेल्या काही दिवसांपासून भंडारा (bhandara) जिल्ह्यास गड़चिरोली , चंद्रपुर (chandrapur), नागपुर (nagpur) जिल्ह्यात आपली दहशत निर्माण केलेल्या वाघाला (tiger) जिवंत पकडण्यात आज (गुरुवार) वन विभागाला (forest department) यश आलं आहे. देसाईगंज (वडसा) तालुक्यातील वाळूमाता प्रक्षेत्रात वन विभागानं बेशुद्धीचे इंजेक्शन देत वाघाला पिंजरा बंद केेले. (Breaking Marathi News)

भंडारा जिल्हासह गड़चिरोली, चंद्रपुर, नागपुर जिल्ह्यात मनुष्याला लक्ष करणा-या सीटी 1 वाघाला गड़चिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे जेरबंद करण्यात आले आहे. भंडारा जिल्हात चार लोकांचा या नरभक्षी वाघाने फड़शा पाड़ला होता. गेल्या महिन्यापासून या वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या टीम जंगलात ठाण मांडून बसल्या होत्या.

gadchiroli, bhandara, chandrapur, nagpur, tiger, wadsa forest department, citizens, city 1 tiger
Chiplun : 'उद्योग मंत्री उदय सामंत आम्हांला न्याय देतील' चिपळूण दाै-याकडं सा-यांचे लक्ष

पावसामुळे वाघाला जेरबंद करण्यात कुठेतरी अडथळा निर्माण होत होता. आज सकाळी वन विभागाच्या सापळ्यात वाघ अडकताच त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले. वडसा वन विभागानी ही कामगिरी केली. (Gadchiroli Latest Marathi News)

gadchiroli, bhandara, chandrapur, nagpur, tiger, wadsa forest department, citizens, city 1 tiger
Accident : शाळेत निघालेल्या विद्यार्थ्याच्या सायकलला कारनं ठाेकरलं; मुलाच्या मृत्यूनं कुटुंबास बसला धक्का

दरम्यान देसाईगंज (वडसा) तालुक्यातील वाळूमाता प्रक्षेत्रात वनविभागाच्या पिंजऱ्यात वाघ जेरबंद झाल्याची बातमी पसरताच जेरबंद केलेल्या वाघाला पाहण्यासाठी वडसा वनविभाग कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी उसळली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com