Krushna Khopde: भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह असतानाही आंदोलनस्थळी

भाजपचे (BJP) अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. इतरांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
Krushna Khopde
Krushna Khopde Saam TV
Published On

नागपूर: भाजप आमदार कृष्णा खोपडे (Krushna Khopde) हे कोरोना पॉझिटिव्ह असतानाही आंदोलनसाठी उपस्थीत होते. आज नागपूरमध्ये चंद्रशेखर बानकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु होते. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करण्यासाठी नागपूर भाजपच्यावतीने आंदोलन सुरु होते. पाच दिवसांपूर्वी खोपडे कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आले होते. पॉझिटिव्ह असताना आंदोलन करणे म्हणजे स्वत:सोबत इतरांचाही जिव धोक्यात घालण्यासारखे आहे. आमदारांना कोरोना नियमांचा विसर पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. भाजपचे (BJP) अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. इतरांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बोलल्यानंतरच आपण घराबाहेर पडल्याचं खोपडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूरमध्ये (Nagpur) कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसऱ्या लाटेच्या वेळी आपण पाहिलं होते की नागपूर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. सध्या तिसऱ्या लाटेच्या पार्वश्वभुमिवर राज्यात कोरोना निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचे पालन करणे हे सर्वसामान्य जनतेपासून लोकप्रतिनिधींना बंधनकारक आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचे संकेत दिले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com